प्रमुख तेल उत्पादक देशांच्या शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत कच्च्या तेलाचे उत्पादन स्थिर ठेवण्याचा निर्णय झाल्याने इंधन दरातील सध्याचा उतार यापुढेही कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तेल उत्पादनात अमेरिकेबरोबरच्या स्पर्धेत असलेल्या ‘ओपेक’च्या १२ सदस्यीय राष्ट्रांच्या बैठकीत तूर्त प्रति दिन ३० दशलक्ष पिंप उत्पादन घेण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. गेल्या साडे तीन वर्षांपासून एवढय़ाच प्रमाणात या देशांकडून तेल उत्पादन घेतले जात आहे.