डीएचएल एक्स्प्रेस या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय वस्तू सेवा प्रदात्या कंपनीने जागतिक स्तरावर दरवाढ करत असल्याची घोषणा केली आहे. १ जानेवारी २०१५ पासून ही दरवाढ अंमलात येणार आहे. देशातील ही दरवाढ सरासरी ९.९ टक्के इतकी असेल. याबाबत ‘डीएचएल एक्स्प्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी केन अ‍ॅलन यांनी सांगितले की, वार्षकि दरवाढीमागे अनेक घटक कारणीभूत असून यामुळे आम्ही चांगली सेवा दिर्घकालावधीत स्पर्धात्मक पध्दतीने उपलब्ध करू शकू. जागतिक स्तरावरील एक्स्प्रेस सेवा देणारे जाळे आमच्याकडे असून यामध्ये आम्ही दरवर्षी जवळजवळ ५० कोटी युरोची गुंतवणूक करतो. कंपनीच्या भारतातील व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सुब्रह्मण्यन म्हणाले की, डीएचएलच्या वार्षकि दरवाढीमुळे देशात सातत्याने गुंतवणूक वाढून महागाई वाढलेली असतांना गुणवत्तेतही वाढ होऊ शकली. रुपयाचे दर सातत्याने कमी होत असल्याने आमच्यावरही यापूर्वीही दबाव निर्माण झाला होता; मात्र आतापर्यंत त्याचा भार टाकणे टाळले जात होते.
‘पेटीएम’तर्फे पूरग्रस्तांसाठी जम्मू काश्मिरसाठी निधी
मुंबई : पेटीएम या भारतातील आघाडीच्या मोबाइल कॉमर्स कंपनीने जम्मू आणि काश्मीर येथील पूरग्रस्तांसाठी विशेष सहाय्य जाहिर केले आहे. पूरग्रस्त काश्मीरच्या खोऱ्यातील नागरिकांच्या सुटका व पुनर्वसनासाठी ‘रिलिफ फंड’ जमवण्याचे कंपनीने ठरवले असून त्यासाठी भरघोस मदत करण्याचे आवाहन केले जाणार आहे. याबाबत ‘पेटीएम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधले पाणी आता ओसरायला सुरुवात झाली असून स्वच्छता मोहिमेने वेग घेतला आहे. या परिस्थितीत नागरिकांचे पुनर्वसन करणे आणि आजारांना दूर ठेवण्याचे आव्हान या राज्यासमोर आहे. ‘रिलिफ फंडा’साठी मिळालेल्या निधी इतक्याच निधीची भर पेटीएम कंपनीदेखील देणार आहे. हे दोन्ही निधी एकत्र करून पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीत त्याची भर घातली जाणार आहे. यानुसार ‘पेटीएम’चे देयक भरताना भरताना किंवा रिचार्जचे पसे देताना १० रुपयांपासून ५०० रुपयांच्या किंमतीचे कूपन घेऊन देणगी देण्याचा पर्याय सुचवला जाणार आहे.