देशांतर्गत बँक खात्याविना आप्तस्वकीयांना पैसे धाडण्याची (रेमिटन्स) सुविधा आणि अन्य अनेक प्रकारच्या भरणा सुविधा प्रदान करणारी सर्वात मोठी बिगरबँकिंग कंपनी बनून सुविधा इन्फोसव्र्ह लि. ही कंपनी पुढे आली आहे. देशभरात तब्बल ८५,००० किरकोळ विक्रेते, किराणा मालाचे दुकानदार यांना आपल्या सेवा जाळ्यात सामावून घेऊन, सुविधाला ग्राहकांना या भरणा सुविधा प्रदान करण्याचे बळ मिळाले आहे.
देशातील ग्रामीण भागात अनेकांचे बँकेत खाते नाही, तर शहरातही विशेषत: स्थलांतरित मजुरांना कायम निवासी पत्ता नसल्याने बँकेत खाते उघडता येत नाही. या व अशा
संगणक निरक्षर मंडळींना आधुनिक तंत्रज्ञान वापरून, पण पारंपरिक मनी ऑर्डरच्या तुलनेत स्वस्त, जलद व सुरक्षितरीत्या देशातील कोणत्याही भागात पैसे धाडण्याची सोय सुविधामुळे शक्य झाली आहे, असे सुविधा इन्फोसव्र्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल भाम्बूरकर यांनी सांगितले.
छोटे दुकानदार, विक्रेत्यांनाही अत्यंत किरकोळ स्वरूपाच्या गुंतवणुकीद्वारे अतिरिक्त महसूल मिळविण्याची संधी आणि व्यवसायवृद्धी अनेकवार शक्यता सुविधाशी जोडले गेल्याने मिळत असून, हा आपला भागीदार परिवार उत्तरोत्तर वाढत असल्याचे भाम्बूरकर यांनी स्पष्ट केले.

सुविधाच्या व्यासपीठावर सध्याच्या घडीला दर महिन्याला साडेचार कोटी इतक्या उलाढाली अत्यंत सुरक्षितपणे व विश्वासार्हरीत्या होत आहेत. २००७ सालापासून कार्यरत कंपनीला त्यामुळेच आजवर ३ कोटी नियमित वापरकर्त्यां ग्राहकांचा विश्वास कमावता आला आहे. सुविधाच्या भागीदार फ्रँचायझींसाठीही हाच ग्राहक अनेकांगी व्यवसायवृद्धी घडवून आणत आहे.
’ राहुल भाम्बूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, सुविधा इन्फोसव्र्ह