जेएसडब्ल्यूसह टाटा स्टीलही मैदानात; थकित कर्जकंपनीच्या कर्मचाऱ्यांचा गटदेखील सहभागी

कर्जाचा मोठा भार असलेली भूषण स्टील ही पोलाद कंपनी खरेदी करण्याच्या स्पर्धेत आता टाटा समूहातील टाटा स्टीलही उतरली आहे. कंपनीचा कर्मचारी गटही या प्रक्रियेत सहभागी झाला आहे. भूषण स्टील खरेदीच्या निविदा प्रक्रियेत जेएसडब्ल्यू लिव्हिंग व पिरामल एंटरप्राईजेस यांची भागीदारीतील कंपनीही सहभागी झाली आहे. कंपनीकरिता विविध उद्योग समूहांनी रस दाखविल्याची माहिती भूषण स्टीलने सोमवारी मुंबई शेअर बाजाराला दिली.

मुंबईत आयोजित केलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणूक व्यवसाय परिषदेला उपस्थित असलेल्या भूषण स्टीलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी टी. व्ही. नरेंद्रन यांनी मात्र याबाबत काहीही भाष्य केले नाही.  थकित कर्जासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या प्रक्रियेकरिता रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केलेल्या पहिल्या यादीतील १२ खात्यांमध्ये भूषण स्टीलच्या कर्जखात्याचा समावेश आहे. कंपनीकडून विविध बँकांचे ४४,४७८ कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे.

टाटा स्टीलच्या निविदा सहभागामुळे भूषण स्टीलचा समभाग सोमवारी मुंबई शेअर बाजारात तब्बल २० टक्क्य़ांनी झेपावला. कंपनीचे मूल्य सत्रअखेर ५३.८० रुपयांवर स्थिरावले. याचबरोबर कंपनीचे बाजार भांडवल २०१.६३ कोटी रुपयांनी उंचावत १,२१८.६३ कोटी रुपयांवर पोहोचले. तर टाटा स्टीलचा समभाग मात्र घसरला