News Flash

संक्षिप्त व्यापार वृत्त : कोलते-पाटील डेव्हलपर्सचे मुंबईत पदार्पण

पुण्यात मुख्यालय असलेल्या कोलते-पाटील डेव्हलपर्स लि. (केडीपीएल)ने मुंबईतील पुनर्विकास क्षेत्राला लक्ष्य करून, खार (पश्चिम) येथील लिकिंग रोडस्थित महत्त्वपूर्ण जागेवर पहिला पुनर्विकास प्रकल्प हाती घेऊन महानगरातील

| August 6, 2013 01:14 am

पुण्यात मुख्यालय असलेल्या कोलते-पाटील डेव्हलपर्स लि. (केडीपीएल)ने मुंबईतील पुनर्विकास क्षेत्राला लक्ष्य करून, खार (पश्चिम) येथील लिकिंग रोडस्थित महत्त्वपूर्ण जागेवर पहिला पुनर्विकास प्रकल्प हाती घेऊन महानगरातील प्रवेश घोषित केला आहे. लिंक पॅलेस प्रीमायसेस हा हा तब्बल १ लाख चौरस फूट विकास क्षेत्र या प्रकल्पातून उभे केले जाणार आहे. केडीपीएल ही मुंबईतील पुनर्विकास क्षेत्रात असलेल्या निवडक कंपन्यांपैकी एक असून, येत्या काळात या प्रचंड मागणी असलेल्या क्षेत्रातील संधींचा फायदा उचलण्याचा मानस ठेवूनच मुंबईत विस्तार केला गेला आहे, असे या समूहाचे मुख्य कार्याधिकारी सुजय कोलते यांनी सांगितले. नजीकच्या भविष्यात दादर-चेंबूर पट्टा, वरळी, मुलुंड, खार-वांद्रे-सांताक्रूझमधील मोक्याच्या जागांवर आपले लक्ष असेल असेही त्यांनी सूचित केले.
श्रीराम फाऊंडेशनकडून ट्रकचालकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती
मुंबई : वाणिज्य वाहनांसाठी कर्जसाहाय्य करणाऱ्या श्रीराम समूहाच्या सामाजिक दायित्व विभाग असलेल्या श्रीराम फाऊंडेशनने अलीकडेच मुंबईतील वाहतूकदार, ट्रकचालकांच्या ११ ते १७ वर्षे वयोगटातील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्तीचे वाटप केले. ‘बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन’च्या कार्यक्रमात, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक यू. जी. रेवणकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम पार पडला. रेवणकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे श्रीराम फाऊंडेशन ‘शिक्षण पाठबळ योजना’ ही विशेषकरून ट्रकचालकांच्या मुलांच्या शिक्षणात आर्थिक कारणाने खंड पडू नये यासाठी सुरू केली आहे. चेन्नइनंतर, मुंबई हे त्यासाठी निवडण्यात आलेले दुसरे शहर असून, टप्प्याटप्प्याने देशभरात उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘गो एअर’तर्फे मान्सून सवलत योजना जाहीर
पुणे : ‘गो एअर’ विमान कंपनीतर्फे कॉर्पोरेट आणि एसएमई (स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायझेस) यांच्याकडून केल्या जाणाऱ्या बुकिंग्जवर तसेच पर्यटकांसाठी ‘गो गेट अ‍ॅडव्हांटेज’ ही मान्सून सवलत योजना जाहीर केली आहे. या योजनेत समाविष्ट होणाऱ्या विमान प्रवाशांना प्रवासादरम्यान काही विशेष लाभ मिळणार आहेत. प्रवासादरम्यान कुटुंबांसाठ, युवकांसाठी कंपनीतर्फे काही नवीन उत्पादनेही सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीने कळवले आहे.
मॅरिअट हॉटेलला ‘ट्रिप अ‍ॅडव्हायजर’ पुरस्कार
पुणे : जे. डब्ल्यू. मॅरिअट हॉटेलला यंदाचा ‘ट्रिप अ‍ॅडव्हायजर सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ हा पुरस्कार मिळाला आहे. ‘ट्रिपअ‍ॅडव्हायजर’ या संकेतस्थळावर सातत्याने चांगला प्रतिसाद प्राप्त करणाऱ्या जागतिक दर्जाच्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. सवरेत्कृष्टतेचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हॉटेल्सना या संकेतस्थळावर आपले सर्वसाधारण मानांकन पाचपैकी चार या पातळीवर सातत्याने राखणे आवश्यक असते. तसेच वर्षभरात प्रत्येक हॉटेलबद्दल किती ग्राहकांनी प्रतिसाद पाठवला आहे हेदेखील पाहिले जाते. जे डब्ल्यू मॅरिअटचे सर्वसाधारण मानांकन ४.५ आहे.
फोर्ड कंपनीच्या १२,००० मोटारींची विक्री
पुणे : ‘फोर्ड’ कंपनीने स्थानिक विक्री आणि निर्यात या माध्यमांतून एका महिन्यात १२,३३८ वाहनांची विक्री केली आहे. यात स्थानिक पातळीवर विक्री करण्यात आलेल्या वाहनांच्या संख्येत जुलै २०१२ च्या तुलनेत २६ टक्क्य़ांची वाढ झाली असून निर्यातीत ११४ टक्क्य़ांची वाढ नोंदवण्यात आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
आजारी कंपन्यांसाठी  गुंतवणूक निधी स्थापन
पीटीआय, नवी दिल्ली : आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या कंपन्यांमधील सरकारी हिस्सा कमी करतानाच त्यांना सहाय्यकारी ठरेल असे पाऊल केंद्र सरकारने उचलले. अर्थविषयक मंत्रिगटाच्या बैठकीत सहा आजारी सरकारी कंपन्यांसाठी विशेष राष्ट्रीय गुंतवणूक निधी स्थापन करण्याचा निर्णय झाला. यानुसार स्कूटर्स इंडिया, आयटीआय, एचएमटी, हिंदुस्थान फोटो फिल्म्स मॅन्युफॅक्चरिंग, त्रावणकोर फर्टिलायझर्स अ‍ॅन्ड केमिकल्स व अ‍ॅन्ड्रू युल अ‍ॅन्ड कंपनी या सहा कंपन्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे. निर्गुतवणुकीच्या माध्यमातून उभा राहणारा निधी या कंपन्यांच्या कामी येणार आहे. सार्वजनिक कंपन्यांमधील सरकारी हिस्सा ९० टक्क्यांच्या आत असावा, असा सेबीचा नवा दंडक आहे. त्याची पूर्तता ८ ऑगस्टपर्यंत करावयाची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 1:14 am

Web Title: top business finance news in short
टॅग : Business News
Next Stories
1 बाजारप्रणालीच धोक्यात आल्याचा निष्कर्ष घाईचा ठरेल: एफएमसी
2 रुपया अवमूल्यनाचा नवा ६१.१० नीचांक
3 झाडाझडती: घसरण कळा दुसऱ्या दिवशी कायम
Just Now!
X