News Flash

मुंबई शेअर बाजारात यूटीआय सेन्सेक्स ईटीएफचे व्यवहार

यूटीआय सेन्सेक्स एक्स्चेंज ट्रेडेड फंडाने (यूटीआय सेन्सेक्स ईटीएफ) ३ सप्टेंबरपासून मुंबई शेअर बाजारामध्ये (बीएसई) व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे.

यूटीआय सेन्सेक्स एक्स्चेंज ट्रेडेड फंडाने (यूटीआय सेन्सेक्स ईटीएफ) ३ सप्टेंबरपासून मुंबई शेअर बाजारामध्ये (बीएसई) व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. यूटीआय सेन्सेक्स ईटीएफता पहिला ट्रेिडग दिवस पूर्ण झाल्याबद्दल बीएसई येथे यूटीआय एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक लिओ पुरी आणि मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषकुमार चौहान यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम झाला.
यूटीआय सेन्सेक्स ईटीएफच्या एनएफओ २४ व २६ ऑगस्ट दरम्यान होता. या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट, खर्चापूर्वी, संबंधित निर्देशांकाने अधोरेखित केलेल्या उत्पन्नानुसार, सिक्युरिटीजच्या एकूण उत्पन्नाशी साधम्र्य असलेले उत्पन्न पुरवणे, हे आहे. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स इंडेक्सशी संबंधित असलेल्या सिक्युरिटीजमध्ये आणि मनी मार्केट साधनांमध्ये यूटीआय सेन्सेक्स एक्स्चेंज ट्रेडेड फंड गुंतवणूक करणार आहे. यूटीआय म्युच्युअल फंड हा सेबी नोंदणीकृत म्युच्युअल फंड असून त्याचे प्रायोजक स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा व लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे आहेत.  यूटीआय म्युच्युअल फंड हा भारतातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडांपकी एक असून जून  २०१५ पर्यंत १६२ देशांतर्गत योजना व प्लॅनअंतर्गत गुंतवणूकदार खाती ९६.७ लाख होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 7:51 am

Web Title: uti sensex etf transaction in mumbai share market
टॅग : Share Market
Next Stories
1 हिताची सिस्टिम्स मायक्रो क्लिनिकचे व्यवसाय विस्तार लक्ष्य
2 सेन्सेक्स २५००० च्या खाली, गेल्या १५ महिन्यांतील निच्चांकी पातळीवर
3 रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन यांची द्विवर्षपूर्ती
Just Now!
X