मोबाइलद्वारे इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेत व्होडाफोनने देशातील महत्त्वाच्या ठिकाणी मोफत वाय-फाय देऊ करण्याचे निश्चित केले आहे. देशाच्या काही शहरांची यासाठी निवड करण्यात आली असून व्होडाफोनधारकांना पहिल्यांदाच फक्त नोंदणी करावी लागेल. यानंतर इंटरनेटसाठी हा पर्याय स्वीकारताना धारकाला कोणत्याही युजर नेम अथवा पासवर्डची गरज नसेल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल. देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोबाइलधारक कंपनी असलेल्या व्होडाफोनला सध्या डाटा (इंटरनेट) सेवेत स्पर्धक भारती एअरटेलचा मोठा सामना करावा लागत आहे. यापूर्वी टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसनेही नऊ शहरांमध्ये ४,००० वाय-फाय केंद्रांची घोषणा केली आहे.