आजची स्त्री ही समाजाला मोठे आíथक योगदान देते. ती काम करते. छोटे व मोठे व्यवसाय करते. सहकारी संस्था सुरू करते किंवा महिला बचत गट सुरू करते. यातून ती कुटुंबाला हातभर तर लावतेच, शिवाय राष्ट्रीय उत्पादनातही सिंहाचा वाटा उचलते. या आíथक स्वातंत्र्यासोबतच तिच्यावर आíथक नियोजनाचीही जबाबदारी येते.

पशाचा विचार केला तर स्त्रियांच्या गुंतवणूक व आíथक गरजा या भिन्न असतात. तसेच त्यांच्यासमोर विशिष्ट जोखीमाही असतात. सामाजिक व्यवस्थेमुळे त्यांच्यावर फार मोठे ओझे गृहीत धरले जाते. गरोदरपणाचा आनंद आणि आíथक आव्हान हे कायम समोर असतेच. नोकरी आणि मातृत्व यात समतोल साधण्यासाठी बहुतेक महिला नोकरीवर पाणी सोडतात किंवा कमी वेतनाचा रोजगार पत्करतात. बरेचदा यातून गुंतागुंत निर्माण होते. यामुळे त्या भावनिक आणि आíथकदृष्टय़ाही कमकुवत बनतात. आई झाल्यानंतर मुलाकडे किंवा वय झालेल्या आई-वडिलांकडे लक्ष देण्यासाठी महिलांना मोठी सुटी घ्यावी लागते आणि परिणामी, नोकरीपासून दूर राहावे लागते. यातून त्यांचे आíथक नुकसान होते आणि बचतही संपते. हे नुकसान भरून काढण्यास पुढची अनेक वष्रे जातात.
स्त्रियांच्या आनुवंशिक आणि जैविक जडण-घडणीमुळे त्यांना विशिष्ट आरोग्य आणि वैद्यकीय समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना स्तनाचा आणि ‘सव्‍‌र्हायकल कॅन्सर’चा धोका असतो. आरोग्य क्षेत्रातील संशोधनामुळे याची तीव्रता आता कमी झाली आहे; मात्र अशा आजारांचा उपाय हा अनेकदा खर्चीक असतो. अनेकदा तर यात संपूर्ण कुटुंबाची आयुष्यभराची कमाईदेखील खर्ची होऊन जाते. लोकसंख्येची नवीन रचना आणि सामाजिक बदलांमुळे बरेचदा महिला वैधव्य, घटस्फोट आणि अविवाहित राहिल्यामुळे एकटय़ा जीवन व्यतीत करत असतात.
संपत्ती जमा करून स्वावलंबी होण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक ठरते. कमी वयात ते केल्यास पुढे त्याचा नक्कीच फायदा होतो. नोकरीच्या सुरुवातीच्या कालावधीत जबाबदारी आणि खर्च कमी असल्यामुळे अधिक पसा वाचवता येतो.
नियोजनातील महत्त्वाचे पाऊल:
ल्ल पूर्ण करता येईल असे ध्येय ठेवणे : महिलांनी एक निश्चित आíथक उद्दिष्ट ठेवावे. उदा. घर विकत घेणे, निवृत्तीनंतर उत्पन्नासाठी पसा जमा करणे, व्यवसाय सुरू करणे, विदेश वारी, वाहन विकत घेणे, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पसा उभा करणे आदी. एकदा उद्दिष्ट ठरले की मग किती रक्कम असावी आणि ती किती काळात जमा झाली पाहिजे, हे ठरवणे महत्त्वाचे ठरते.
ल्ल उत्तम नियोजन : आíथक नियोजनामध्ये उत्पन्न आणि खर्च, तसेच भविष्यातील उत्पन्न आणि खर्च याचा समावेश असतो. यामुळे भविष्यात विविध गरजांसाठी किती पसा लागेल याचा अंदाज येतो. काळ, जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचे पर्याय यांचाही विचार केला जातो. आकस्मिक गरजांसाठी पसा वेगळा काढून ठेवणेसुद्धा आवश्यक आहे. जसे – आजारपण, जोडीदाराचा अथवा स्वत:चा मृत्यू किंवा नोकरी जाणे. गृहिणींनी घरगुती बचत उपलब्ध पर्यायांपकी कुठेतरी गुंतवावेत.
ल्ल पुढील तक्ता पाहा:
गुंतवणूक ही एकाच प्रकारची न करता वेगवेगळ्या प्रकारची करावी. त्यामुळे त्यातून पुरेसे उत्पन्न मिळते आणि महागाईमुळे त्याची खरेदीची क्रयशक्ती कमीही होत नाही. तुलनेत महिलांचे आयुष्य जास्त असते आणि त्यामुळे पुरेसे उत्पन्न मिळणे महत्त्वाचे आहे. (योग्य नियोजनासाठी मान्यताप्राप्त आíथक सल्लागाराकडून मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरते.)
ल्ल शिस्तबद्ध गुंतवणूक : आíथक नियोजन यशस्वी होण्यासाठी शिस्तबद्ध गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आजकाल सर्व गुंतवणूक ‘ऑनलाइन’ करता येते. आíथक सल्लागार हे संबंधित कागदपत्रे तयार करावयास मदत करतात, मात्र गुंतवणूक करण्याआधी त्याचे स्वरूप आणि त्यातील जोखीम समजून घेणे महत्त्वाचे आहे.
ल्ल वेळोवेळी पाठपुरावा करणे : गुंतवणूक केल्यावर अधून-मधून त्याची समीक्षा करणे महत्त्वाचे आहे. यामुळे ती व्यवस्थित सुरू आहे याची खात्री करता येते. तसेच बदलत्या गरजेचा आणि बदलत्या बाजारानुसार योग्य ते बदल करता येतात. उदाहरणार्थ, विविध गुंतवणुकींपासून होणाऱ्या लाभाची वेळोवेळी समीक्षा करणे. शेअर बाजारातील बदलांमुळे गुंतवणुकींवर परिणाम होऊ शकतो. यामुळे काही गुंतवणुकीतून निधी बाहेर काढावा लागेल किंवा नवीन गुंतवणूक करावी लागेल. हे तुम्ही अर्थातच किती जोखीम घेऊ शकता, यावर अवलंबून असते.
ल्ल गुंतवणुकीवरील फायदा : गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण होत आले की त्यापासून होणारा लाभ पदरात पाडून त्या गुंतवणुकीतून पसा काढून घ्या. आयुर्वम्यिाबाबतीत यासाठी कागदपत्रे विमा कंपनीकडे जमा करावी लागतात. आर्थिक लाभ मिळाल्यावर त्यावर कर लागेल काय किंवा तो कसा आणि लागल्यास किती, याविषयी आíथक सल्लागाराचे मार्गदर्शन जरूर घ्या.

(लेखिका एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सच्या कार्यकारी संचालिका व मुख्य वित्त अधिकारी आहेत.)