गेल्या दहा वर्षांत नव्या संवत्सराच्या स्वागताच्या मुहूर्तावर सेन्सेक्स केवळ दोन वेळाच घसरला आहे. यंदाच्या मुहूर्ताला सेन्सेक्समधील ही तिसरी घसरण आहे. यापूर्वी २००१ आणि २००७ मध्ये ‘सेन्सेक्स’ या दिवशी अनुक्रमे ०.७९ व १.७९ टक्क्यांनी खाली आला होता.
२००८ मध्ये तर मुहूर्ताला सेन्सेक्सने तब्बल ६ टक्क्यांची झेप घेतली होती. सेन्सेक्स त्यावेळी ९,००८ वर होता. एकूण दिवाळी ते दिवाळी अशा संपूर्ण संवत्सर कालावधीत सर्वाधिक ९१.५६ टक्क्यांची वाढ मुंबई निर्देशांकात २००८-०९ या दरम्यान झाली आहे. त्या अगोदर १० जानेवारी २००८ रोजी मुंबई निर्देशांकाने २१,२०६.७७ हा सर्वोच्च बिंदू गाठला होता. तर आधीच्या वर्षांत मात्र मुंबई शेअर बाजाराने गेल्या दोन दशकांमधील सर्वात मोठी घसरण नोंदविली होती. ५१.९२ टक्के घसरणीमुळे सुरुवातीला १८,७३७.२७ वर असणारा बाजार वर्षअखेपर्यंत थेट ९,००८.०८ पर्यंत खाली आला होता. यानंतर २००९ आणि २०११ मध्ये त्याने १७,२०० च्या वपर्यंत प्रवास केला. तर मधल्या २०१० सालात सेन्सेक्सने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावरच २१,००४.९६ असे सर्वोच्च स्थान गाठले होते.  सरत्या संवत्सर २०६८ चा प्रारंभ करताना मुंबई शेअर बाजार २६ ऑक्टोबर २०११ रोजी १७,२८८.८३ वर होता. वर्षभरात ‘सेन्सेक्स’ १,४०० अंशांनी वधारला. २०६९ संवत्सराचा प्रारंभ करतानाही बाजाराने फारसा उत्साह न दाखविल्याने एकूण संवत्सराचा प्रवास कसा राहतो, एवढेच आता बाकी आहे.