मल्टि कमॉडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स)ने आपली नफाक्षमता कायम राखताना, भागधारकांना गेल्या वर्षांइतकाच भरघोस लाभांश घोषित केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने १० रु. दर्शनी मूल्याच्या समभागामागे १२ रुपये (१२०%) अंतिम लाभांश देऊ केला आहे. संपूर्ण वर्षांतील एकूण लाभांश मार्च २०१३ अखेर प्रति समभाग २४ रुपये इतका होतो. सरलेल्या आर्थिक वर्षांसाठी या आघाडीच्या वस्तू वायदा बाजाराची दैनंदिन उलाढाल ही आधीच्या वर्षांतील ५०,३१३ कोटींवरून ४८,७९० कोटी रुपयांवर घसरली असली तरी एकूण उत्पन्न दोन टक्क्यांनी वाढून रु. ६४४.६९ कोटींवर तर निव्वळ नफा चार टक्क्यांनी वाढून रु. २९८.६४ कोटींवर गेला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2013 रोजी प्रकाशित
‘एमसीएक्स’कडून १२०% लाभांश
मल्टि कमॉडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स)ने आपली नफाक्षमता कायम राखताना, भागधारकांना गेल्या वर्षांइतकाच भरघोस लाभांश घोषित केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने १० रु. दर्शनी मूल्याच्या समभागामागे १२ रुपये (१२०%) अंतिम लाभांश देऊ केला आहे.
First published on: 31-05-2013 at 02:52 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 120 dividend by mcx