चितळे बंधूंचा राज्यात नवीन प्रकल्प; ७५ कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा

कंपनीने ‘बिंजबार’ हा नमकीन श्रेणीतील नवीन उत्पादन बाजारात आणले आहे.

मुंबई : पारंपरिक खाद्यपदार्थ क्षेत्रातील नावाजलेली नाममुद्रा असलेल्या चितळे बंधूंनी वर्षभरात महाराष्ट्रात ७५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे. पुण्याजवळील खेड शिवापूर येथे नवीन खाद्यपदार्थ उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना असून यातून २५० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.

कंपनीने विक्री आणि विपणन विभागाच्या विस्ताराचीही योजना आखली असून, या माध्यमातून १०० लोकांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे चितळे समूहाचे व्यवस्थापकीय भागीदार इंद्रनील चितळे यांनी सांगितले.

चितळे बंधूंची चौथी पिढी सध्या व्यवसायात असून, कंपनीने २०० कोटींच्या महसुलापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट राखले आहे. इंद्रनील चितळे यांनी स्पष्ट केले की, व्यवसायाच्या तत्त्वांना बांधील राहून पारंपरिक पदार्थासोबतच येत्या काळात आणखी नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणण्याची योजना आहे.

कंपनीने ‘बिंजबार’ हा नमकीन श्रेणीतील नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध आणि दुग्धजन्य प्रक्रिया आणि विविध खाद्य उत्पादने चितळेंकडून तयार केली जातात. चितळेंचा दुधाचा व्यवसाय दिवसाला सहा ते सात लाख लिटर दूध संकलनावर पोहोचला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 75 crore investment for new project by chitale bandhu in the maharashtra news

Next Story
‘कन्साइ नेरॉलॅक’ला सणांच्या हंगामात मागणीतील दुप्पट वाढ अपेक्षित
ताज्या बातम्या