केंद्रीय अर्थमंत्रालयाने आजवरच्या प्रथेच्या विपरीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाचे सदस्य म्हणून केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे राजीव मेहऋषी यांच्या जागी त्या खात्याचे अतिरिक्त सचिव अजय त्यागी यांचे नाव पुढे केले असून, त्यांची ताबडतोबीने नेमणूक करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळातील १७ सदस्यांमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर आणि चार डेप्युटी गव्हर्नर यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय अर्थमंत्रालयात कार्यरत वित्तीय सेवा सचिव यांच्यासह, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव यांच्या नियुक्तीची प्रथा राहिली आहे. त्यातूनच आजवर राजीव मेहऋषी हे रिझव्‍‌र्ह बँकेवर प्रतिनिधित्व करीत आले होते. मेहऋषी यांच्याकडे वित्त सचिव असाही अतिरिक्त पदभार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या संकेतस्थळावर मात्र मध्यवर्ती संचालक मंडळाच्या १७ सदस्यांमध्ये मेहऋषी यांचे नाव कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Against rule ajay tyagyi appointed on the board of directors of the reserve bank
First published on: 01-08-2015 at 01:03 IST