नवी दिल्ली : टाटा समूहाच्या मालकीची हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया प्रवासी विमान सेवांचा विस्तार करण्यासाठी चालू वर्षांत डिसेंबरमध्ये ताफ्यात ३० नवीन विमानांचा समावेश करणार आहे, अशी माहिती एअर इंडियाने सोमवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअर इंडिया देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विमान वाहतूक सेवांना चालना देण्यासाठी प्रयत्नशील असून याचाच एक भाग म्हणून पाच मोठी बोईंग विमाने आणि २५ एअरबस लहान (नॅरो-बॉडी) विमाने ताफ्यात समाविष्ट करणार आहे. कंपनी भाडेतत्त्वावर पुढील १५ महिन्यांच्या कालावधीसाठी ही विमाने घेणार असून त्याबाबत करारावर स्वाक्षरी झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. २०२२ च्या उत्तरार्धापासून सेवेत दाखल होणारी ही नवीन विमाने, एअर इंडियाच्या विमान ताफ्यात २५ टक्क्यांहून अधिक वाढ करतील. टाटा समूहाने एअर इंडियाच्या ताबा घेतल्यानंतर विमान ताफ्याचा हा पहिला मोठा विस्तार आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india to expand fleet with induction of 30 new aircraft zws
First published on: 14-09-2022 at 02:28 IST