अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानवर झेप घेतली आहे. चीनमधील उद्योजक झोंग शानशान यांना अदानींने मागे टाकलं आहे. ब्लुमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार शेअर बाजारात अदानी समुहाच्या समभागांची म्हणजेच शेअर्सची मागणी वाढल्याने त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झोंग हे फेब्रुवारीपर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी होते मात्र रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांना मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं. या वर्षी अंबानींना १७५.५ मिलियन अमेरिकन डॉलर्सचं नुकसान झालं आहे तर दुसरीकडे अदानींच्या एकूण संपत्तीमध्ये ३२.७ बिलियन अमेरिकन डॉलर्सने (२३८ कोटी ६७० लाखांनी ) वाढ झालीय. अदानींची एकूण संपत्ती ६६.५ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचली असून झोंग यांची एकूण संपत्ती ६३.६ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. अंबांनींची एकूण संपत्ती ७६.५ बिलियन डॉलर्स इतकी आहे. अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १३ व्या स्थानी आहेत. सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानींनी १४ व्या स्थानी झेप घेतलीय.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambani and adani asia richest and second richest persons are now indians scsg
First published on: 21-05-2021 at 09:33 IST