शेअर बाजारातल्या आयपीओ किंवा प्रारंभिक समभाग विक्री बाजारामध्ये एक बातमी खळबळ माजवण्याची शक्यता आहे, ती म्हणजे बाबा रामदेवांची पतंजलि आयुर्वेद ही कंपनी शेअर बाजारात उतरण्याची शक्यता आहे. योग गुरू बाबा रामदेव यांनी या संदर्भात एक सूचक विधान केल्याची बातमी पीटीआयने दिली आहे. एका कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी बाबा रामदेवना विचारलं की, पतंजलिची नोंदणी जास्त भांडवल उभारण्यासाठी शेअर बाजारात करणार का? यावर बोलताना बाबा म्हणाले की एका महिन्यात या संदर्भात तुम्हाला मी गुड न्यूज देणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत हा उत्पादनासाठी चांगलं क्षेत्र बनू शकतं असं सांगताना बाबा रामदेव म्हणाले की जर वाजवी दरांमध्ये उत्पादन क्षेत्रासाठी चांगल्या जागा उपलब्ध झाल्या तर भारत मॅन्युफॅक्चरिंग हब बनू शकेल. अनेक कंपन्यांना भेडसावत असलेल्या समस्या बघता बँकांनीही पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अर्थात, मल्यासारख्या घटना घडू नयेत यासाठी बँकांनी काळजी घ्यावी व चांगल्या उद्योजकांनाच कर्ज द्यावं अशी पुष्टीही रामदेव यांनी जोडली आहे. याआधी दोन महिन्यांपूर्वी बाबा रामदेव यांनी पतंजलिसाठी विदेशी भांडवल वा स्टॉक मार्केटमध्ये नोंदणी हे दोन्ही पर्याय स्वीकारणार नसल्याचे सांगितले होते, कारण पतंजलि ही धर्मादाय संस्था आहे.

मात्र, येत्या एक ते दोन वर्षात उत्पन्नाच्या बाबतीत हिंदुस्थान लीव्हरला मागे टाकण्याची व या क्षेत्रातला जगातला पहिल्या क्रमांकाचा ब्रँड पाच ते सहा वर्षांमध्ये बनवण्याची महत्त्वाकांक्षा रामदेव यांनी व्यक्त केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या महिन्याभरात बाबा रामदेव पतंजलिचा आयपीओ बाजारात आणण्याची घोषणा करतील अशा चर्चांना वेग आला आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba ramdevs patanjali may announce ipo next month
First published on: 13-12-2018 at 17:42 IST