मुंबई : रिझव्र्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी सलग ११ व्या द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीत रेपो दर ४ टक्क्यांच्या अल्पतम पातळीवर कायम ठेवला असला तरी, जगभरातील भू-राजकीय अनिश्चितता आणि किंमतवाढीचा भडका पाहता आगामी काळात रोख महागाई नियंत्रणाकडे राहील, असे स्पष्ट केले आहे. त्याचे पडसाद बँकिंग वर्तुळात उमटू लागले असून, बँक ऑफ बडोदाने सोमवारी तिच्या कर्जाचे व्याजदर ०.०५ टक्क्यांनी वाढवत असल्याचे स्पष्ट केले. मंगळवार, १२ एप्रिलपासून लागू होणाऱ्या दरवाढीमुळे, बँक ऑफ बडोदाच्या एक वर्ष मुदतीच्या ‘एमसीएलआर’वर आधारित व्याजदर ७.३५ टक्क्यांवर गेला आहे. याचप्रमाणे एक महिना, तीन महिने, सहा महिने मुदतीच्या कर्ज व्याजदरातही ०.०५ टक्के वाढ बँकेने केली आहे. परिणामी बँकेकडून वितरित वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि गृह कजार्च्या व्याजदरात आनुषंगिक वाढ होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2022 रोजी प्रकाशित
बँक ऑफ बडोदाची कर्जे महागली!
बँक ऑफ बडोदाच्या एक वर्ष मुदतीच्या ‘एमसीएलआर’वर आधारित व्याजदर ७.३५ टक्क्यांवर गेला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-04-2022 at 00:34 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank of baroda increase interest rates on loans zws