कोहिनूर बिझनेस स्कूलने ११ महिने कालावधीचे विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम जाहीर केले आहेत. यामध्ये आदरातिथ्य (हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी), आरोग्य (हॉस्पिटल आणि आरोग्यनिगा) आणि कार्यरत प्रतिनिधी (वर्किंग एक्झेक्युटिव्ह) या विषयांचा समावेश आहे. अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष कार्याची संधी या अभ्यासक्रमाद्वारे मिळणार असल्याचे कोहिनूरने म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती कोहिनूर बिझनेस स्कूल, कोहिनूर सिटी, एलबीएस मार्ग, विद्याविहार (पश्चिम), मुंबई – ४०० ०७० येथे अथवा ६६६.‘ँ्रल्ल१.ी४ि.्रल्ल या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दादरच्या धर्तीवर बोरिवलीत महाराष्ट्र व्यापार पेठ
मुंबई:  दरवर्षी गणेशोत्सव ते दिवाळी असे जवळपास अडीच महिने दादरच्या मध्यवर्ती भागात भरणाऱ्या महाराष्ट्र व्यापारी पेठेच्या धर्तीवर बोरिवलीतही पेठेचे आयोजन मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाने केले आहे. या पेठेला शुक्रवार ३ जानेवारीपासून सुरुवात होईल व ती १२ जानेवारीपर्यंत भाटिया हॉल, श्री भाटिया बालरक्षक चौक, वीर सावरकर उद्यानासमोर, बाभई, बोरिवली (प.) या ठिकाणी सुरू राहील. अधिकाधिक नवउद्योजकांना या संधीचा लाभ घेऊन गाळे आरक्षित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.