आघाडीच्या चॉकलेट निर्माता ‘कॅडबरी इंडिया’कडून मोठय़ा प्रमाणातील कर बुडवेगिरीच्या दोन घटना केंद्रीय अबकारी खात्याने उघडकीस आणल्या आहेत. यामुळे सरकारच्या तिजोरीतील २१३ कोटी रुपयांचा महसुल बुडाला असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री एस. एस. पलनीमणिक्कम यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.
सरकारच्या नव्या माहितीमुळे कॅडबरीपुढे दुसऱ्यांदा संकट निर्माण झाले आहे. गेल्या वर्षीही क्राफ्ट फूड्सकडून कॅडबरीच्या १९ अब्ज डॉलरच्या खरेदी व्यवहारावर कर आकारता येईल काय, याबाबत सरकारने विचारणा केली होती. अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
कॅडबरीने आर्थिक वर्ष २००९-१० आणि २०१२-१३ असे दोन वेळा करबुडवेगिरीचे प्रकार केल्याचे केंद्रीय अबकारी खात्याच्या निदर्शनास आल्याचे पलनीमणिक्कम यांनी स्पष्ट केले. ‘मॉन्डेल्ज इंटरनॅशनल’ या कॅडबरीची स्थानिक कंपनीच्या हिमाचल प्रदेशातील बड्डी येथील प्रकल्पाने २०० कोटींचा अबकारी कर बुम्डविला आहे. या जागेच्या व्यवहारामार्फत कंपनीने चुकीच्या पद्धतीने करसवलत मिळविली, अशीही चर्चा आहे. एका अंदाजानुसार ही रक्कम १० अब्ज रुपयांची होते. कॅडबरीने यापूर्वी रु. १३.४३ कोटींचा सेवा कर बुडविल्याचा खटला न्यायालयासमोर होता. त्यावेळी न्यायालयाने दंडापोटी भरावयाची रक्कम मिळून ११ कोटी ७५ लाख रुपये भरण्याचे निर्देश दिले होते, असे त्यांनी या वेळी सांगितले
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
कॅडबरीकडून २१३ कोटींची करचुकवेगिरी
आघाडीच्या चॉकलेट निर्माता ‘कॅडबरी इंडिया’कडून मोठय़ा प्रमाणातील कर बुडवेगिरीच्या दोन घटना केंद्रीय अबकारी खात्याने उघडकीस आणल्या आहेत. यामुळे सरकारच्या तिजोरीतील २१३ कोटी रुपयांचा महसुल बुडाला असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री एस. एस. पलनीमणिक्कम यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.

First published on: 23-11-2012 at 01:18 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cadbury india under probe for rs 213 cr tax evasion