संचालकपदी राय यांच्या नियुक्तीला भागधारकांचा विरोध

राय सध्या कंपनीचे बिगर-कार्यकारी अध्यक्ष या नात्याने संचालक मंडळावर होते. 

मुंबई : देशाचे माजी नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) म्हणून कारकीर्द राहिलेले विनोद राय यांची आयडीएफसी लिमिटेडच्या संचालक मंडळावर फेरनियुक्तीचा प्रस्ताव भागधारकांनी बुधवारी बहुमताने फेटाळून लावला. राय सध्या कंपनीचे बिगर-कार्यकारी अध्यक्ष या नात्याने संचालक मंडळावर होते. 

कंपनीची बुधवारी २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यात राय यांना गैर-स्वतंत्र संचालकपदी नियुक्तीच्या प्रस्तावावर घेतलेल्या मतदानात ६२.२८ टक्के भागधारकांनी विरोधी मत नोंदविले. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून घेण्यात राय यांच्या नियुक्तीला मान्यता देणारे (३७.१ टक्के) अल्पमतात होते.  राय यांची ही नियुक्ती २२ मे २०२३ पर्यंत प्रस्तावित होती. मात्र आवश्यक मतांचा कौल न आल्याने त्यांचे नामांकनच गुंडाळण्यात आले. याच वेळी भागधारकांनी जैमिनी भगवती आणि अनिल सिंघवी यांच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्तीला मान्यता दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cag vinod rai proposal for re appointment to the board of directors of idfc limited akp

फोटो गॅलरी