मुंबई : भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) वर्ष २०२१-२२साठी टाटा स्टील लिमिटेडचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांनी उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशव्यापी उद्योग संघटनेच्या सोमवारी दूरचित्र संवादाद्वारे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज हे २०२१-२२ साठी ‘सीआयआय’चे नियुक्त अध्यक्ष असतील. नवनियुक्त अध्यक्ष नरेंद्रन यांनी कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांच्याकडून पदभार स्वीकारला.

नरेंद्रन हे सीआयआयमध्ये राज्य, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. ते आयआयएम, कोलकत्ता आणि एनआयटी, त्रिचीचे माजी विद्यार्थी आहेत. ते एक्सएलआरआय, जमशेदपूरच्या सुशासन मंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय मेटल्स इन्स्टिटय़ूट ऑफ मेटल्सचे ते उपाध्यक्ष आहेत. ते वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या मंडळाचे सदस्य होते. २०१३ ते २०१८ या कालावधीत ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या ‘मायनिंग अँड मेटल्स गव्हर्नर्स कौन्सिल’चे सह- अध्यक्ष होते. पवन मुंजाल जवळजवळ ३० वर्षांंपासून संघटनेशी संबंधित आहे. ते १९९६ मध्ये सीआयआयच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष होते. संजीव बजाज हे २०१९-२०२० दरम्यान सीआयआयच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cii elects t v narendran as new president pawan munjal as vice president zws
First published on: 01-06-2021 at 02:01 IST