या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्तीकर अधिनियम १९६१ काही वजावटी देऊ करतो. सर्व प्रकारचे करदाते प्राप्तीकर विवरण भरतेवेळी या वजावटीचा उपयोग कर बचतीचा दावा करू शकतात. मागील काही वर्षांमध्ये समभाग संलग्न बचत योजना (ईएलएसएस) करबचतीचा लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणून समोर आला आहे. कर बचतीच्या इतर पर्यायांमध्ये ईएलएसएसला प्राधान्य का दिले जात असावे. याची पाच मुख्य कारणे आहेत.

कमी मुदतीचा लॉकइन कालावधी

ईएलएसएसचे लोकप्रिय वैशिष्टय़ म्हणजे कलम ८० सी उत्पादनांच्या तुलनेत यामध्ये कमी मुदतीचा लॉक—इन कालावधी असतो. बँक मुदत ठेवी (एफडी), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी) आणि युलिप (युनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लॅन) हे पर्याय पाच वर्षांच्या लॉक—इन कालावधीसह उपलब्ध असतात. तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) चा कालावधी १५ वर्षांचा असतो. दुसरीकडे ईएलएसएस तुलनात्मक ३ वर्षांच्या अल्प लॉक—इन कालावधींसाठी असतात. ईएलएसएसचे लॉक—इन वैशिष्टय़ इतर कर—बचत पर्यायांच्या तुलनेत फंडांसाठी वेगाने सुविधा देतो. यामुळे गुंतवणूकदार भांडवल पुन्हा त्याच किंवा इतर योजनेत गुंतवू शकतात.  दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय तयार करू शकतात किंवा आपल्या गरजेनुसार वापर करू शकतात.

उत्तम वैविध्य आणि व्यावसायिक व्यवस्थापन

ईएलएसएस फंडांची गुंतवणूक ही भांडवली बाजारात होत असते. समभागांमधील पोर्टफोलियोत विविध प्रकारची गुंतवणूक करण्यास त्याची मदत होते आणि केंद्रीकरणाची जोखीम कमी होते. त्याशिवाय ईएलएसएस योजनांचे व्यवस्थापन निधी व्यवस्थापक करतात. जे तज्ज्ञ असतात व त्यांची कार्यतत्पर संशोधनपर चमू बाजारातील प्रगतीवर लक्ष ठेवून असते.

एसआयपीची, एक चांगली सवय

ईएलएसएस नियमित मध्यंतरांमध्ये  लहान रकमेत गुंतवणूक करण्याची संधी देते. ज्यामुळे गुंतवणूकदाराची दैनंदिनी शिस्तीत सुरू राहते. त्याच्या पाकिटावर ताण येत नाही. त्यामुळे इतर कर बचत पर्यायांमध्ये गुंतवणूकदार ईएलएसएसला पसंती देताना दिसतात. गुंतवणूकदार रु. ५०० च्या लहान रकमेत एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन) करू शकतात. एसआयपीचा लॉक—इन कालावधी कमीत कमी तीन वर्षांचा असतो. एसआयपीचे उद्दिष्टय़ गुंतवणूकदाराला त्यांच्या वित्तीय गणिताला धक्का न पोहोचवता गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आहे.

महागाईशी मुकाबला करण्याची शक्यता अधिक

ईएलएसएसची गुंतवणूक भांडवली बाजारात करण्यात येते. त्यामुळे हा पर्याय इतर कोणत्याही कर—बचत उत्पादनाशिवाय सरस ठरत असला तरी दरवेळी हिच परिस्थिती असेल असे नाही. बाजारांच्या बदलत्या स्थितीवर ते अवलंबून असते. या पर्यायात महागाईशी मुकाबला करण्याची शक्यता अधिक आहे.

बाजारातील अस्थिरतेमुळे कमीतकमी अतिक्रमण

भांडवली बाजाराला रोखे बाजार गुंतवणूकदारांच्या तुलनेत अनेकदा गुंतवणूक जागा देणारे आणि कमी जोखीमीचे म्हणून पाहिले जाते. ईएलएसएसवर बाजारातील अस्थिरतेचा फारसा परिणाम होत नाही. कारण पहिल्यांदा लॉक—इन कालावधी गुंतवणुकदाराला त्यांना अपेक्षित परतावा मिळवून देतो आणि गुंतवणूकदाराना अल्प—कालावधीतील बाजार अस्थिरते दरम्यान गुंतवणूक करण्यासाठी दबाव टाकला जातो.

लेखक मोतीलाल ओसवाल एएमसी (एमओएएमसी) चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Equity linked savings scheme
First published on: 16-05-2017 at 01:51 IST