‘इंडियन प्लंम्बिंग असोसिएशन’च्या सहयोगाने संकल्प

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिनोलेक्स इंडस्ट्रीजने ‘इंडियन प्लंम्बिंग असोसिएशन’च्या (आयपीए) पुण्यातील गटाच्या सहकार्याने एक कोटी लिटरहून अधिक पाण्याची बचत करण्याचा संकल्प सोडला आहे. पाण्याचे जतन आणि त्याचा योग्य वापर यावर जागरुकता वाढविण्यासाठीच्या मोहिमेतील हा दुसरा टप्पा आहे.

याबाबत पुण्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अनेक जल संवर्धन क्षेत्रातील वक्ते व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. ‘इन्स्टिटय़ुट ऑफ इंडियन इंटेरिअर डिझाइन’ व ‘इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ आíकटेक्ट्स’ (आयआयए) च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तज्ज्ञांनी यावेळी नियमित जीवनशैली व राहणीमानाच्या सवयींमध्ये बदल न करता हरित उत्पादन वापराच्या माध्यमातून कार्यक्षम पाणी वापराची तंत्रे आणि पाणी पुर्नप्राप्तीची तंत्रे स्पष्ट केली. हे बदल महाराष्ट्रातील लोकांद्वारे सामना केल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याबाबतच्या समस्याचे निराकरण होण्यास मोठे पाऊल उचलण्याकरिता प्रोत्साहन प्रदान करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पुण्यामधील ‘आयपीए’च्या गटाने नियोजित केलेल्या आराखडा प्रकल्पांपकी ९० टक्के प्रकल्पांची अंमलबजावणी ५ कोटी लिटरच्या पाणी बचतीने होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. हे प्रकल्प फिनिक्स मॉल, डीएव्ही पब्लिक स्कूल, सिटी प्राईड, कोथरुड मल्टीप्लेक्स व स्थानिक विमानतळ आदी आहेत.

संयुक्त राष्ट्रानुसार, भारतातील पाण्याचा वापर गेल्या काही दशकांमध्ये लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा दुपटीहून अधिक झाला आहे. २०२५ पर्यंत पाण्याचा वाढता वापर हा विकास व वातावरणातील बदलामुळे जगाच्या लोकसंख्येपकी दोन तृतियांश भाग लोकसंख्या पाणी नसलेल्या क्षेत्रांमध्ये वास्तव्य करण्यासोबतच १.८ अब्ज रहिवाशांना पाणी टंचाई समस्येला सामोरे जावे लागेल.

भारतासारख्या देशात दरवर्षी जलवाहिन्यांमधून होणाऱ्या पाणीगळतीमुळे जवळपास ४० टक्के पाणी वाया जाते. दरवर्षी सरासरी ७२० मिमी पावसाचे पाणी भूजल स्त्रोतांच्या अभावामुळे वाया जात असल्याचीही आकडेवारी आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finolex will save one lakh liter water
First published on: 27-04-2016 at 06:25 IST