अर्थसाक्षरता आणि वित्तीय सर्वसमावशेकतेचा पुढची पायरी म्हणजे सुदृढ गुंतवणूक संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने मुंबईस्थित तथास्तू अॅडव्हायजरी प्रा. लि.ने संपूर्णपणे मोफत गुंतवणूक सल्लागार सेवा सुरू केली असून, त्यासाठी दर दिवशी २५,००० हून अधिक कॉल्स हाताळू शकणारे मोठे कॉल सेंटर स्थापित केले आहे.
तथास्तू अॅडव्हायजरीने सुरू केलेली ‘द मार्केट – फायनान्शियल इंटेलिजन्स’ नाव असलेली ही सेवा अहोरात्र व सप्ताहाचे सातही दिवस ८०८००९०९०० या क्रमांकाद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या या कॉल सेंटरमधील सल्लागारांशी हिंदी आणि इंग्रजीतून संवाद साधता येईल, परंतु पुढे या सेवेच्या विस्ताराबरोबरच संवादाच्या भाषांचे पर्यायही वाढविण्यात येतील.
भांडवली बाजारातील दीर्घ वा अल्पकालीन गुंतवणूक, इक्विटी फ्यूचर्स व ऑप्शन्समधील गुंतवणूक, कमॉडिटीज्मध्ये धातू, सोने, कृषी-उत्पादने, ऊर्जा, चलन सौद्यातील गुंतवणूक, म्युच्युअल फंड आणि विमा अशा सर्वच गुंतवणूक पर्यायांबाबत सर्वोत्तम सल्ला आणि प्रत्येकाच्या जोखीम पत्करण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा आवाका लक्षात घेऊन सुयोग्य उपाययोजना पुरविणाऱ्या तज्ज्ञ व अनुभवी सल्लागारांचा संघ कंपनीकडे असल्याचा तथास्तू अॅडव्हायजरीचे संचालक पराग ठक्कर यांनी केला. ही एक दलाल पेढी अथवा कोणत्याही बडय़ा उद्योगसमूहाचा भाग नसलेली संस्था असल्याने गुंतवणूकदारांना सर्वोत्तम व निष्पक्ष अशा मार्गदर्शनाची खात्री बाळगता येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2013 रोजी प्रकाशित
मोफत गुंतवणूक सल्लागार सेवा ‘तथास्तू’चे देशस्तरावर अनावरण
अर्थसाक्षरता आणि वित्तीय सर्वसमावशेकतेचा पुढची पायरी म्हणजे सुदृढ गुंतवणूक संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने मुंबईस्थित तथास्तू अॅडव्हायजरी प्रा. लि.ने संपूर्णपणे मोफत गुंतवणूक सल्लागार सेवा सुरू केली असून, त्यासाठी दर दिवशी २५,००० हून अधिक कॉल्स हाताळू शकणारे मोठे कॉल सेंटर स्थापित केले आहे.
First published on: 11-04-2013 at 04:25 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free advice service of investment by tathastu