अ‍ॅपल हा जगातील पहिल्या क्रमांकाचा ब्रॅड आहे. परंतु आता ऑईल क्षेत्रापासून ते टेलिकॉम क्षेत्रात सर्वच ठिकाणी यशाची शिखरं गाठणाऱ्या मुकेश अंबानी यांचा रिलायन्स हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रॅन्ड ठरला आहे. फ्युचर ब्रॅन्ड इंडेक्स २०२० मध्ये अॅपलनंतर दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्सनं झेप घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलायन्स इंडस्ट्रीज रिफायनरी, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. रिलायन्सनं दुसऱ्या क्रमांकासाठी सर्वात मोठी झेप घेतली आहे. तसंच प्रत्येक ठिकाणी रिलायन्सनं आपल्याला सिद्ध केलं असल्याचं फ्युचब्रॅन्ड इंडेक्स २०२० ची यादी जाहीर करताना सांगण्यात आलं. रिलायन्स ही कंपनी भारतात सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. तसंच कंपनीबाबत सर्वांमध्ये चांगली भावना आहे आणि कंपनीदेखील नैतिकदृष्ट्या काम करते. नाविन्यपूर्ण उत्पादनं, उत्तम ग्राहक अनुभव आणि वृद्धी यासोबत कंपनी जोडली गेली असून कंपनीचे सर्वांसोबतच भावनिक संबंध आहेत, असंही यावेळी नमूद करण्यात आलं.

कोणते आहेत टॉप १० ब्रॅन्ड ?

अ‍ॅपल

रिलायन्स

सॅमसंग

एनविडिया

मोताई

नायकी

मायक्रोसॉफ्ट

एएसएमएल

पेपाल

नेटफ्लिक्स

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Future brand index mukesh ambani reliance step to second place after apple jud
First published on: 06-08-2020 at 15:33 IST