फॉन्टेराशी भागीदारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : दुग्ध व्यवसायात विस्ताराचे पाऊल म्हणून फ्युचर समूहाने न्यूझीलंडच्या फॉन्टेरा कंपनीबरोबर व्यावसायिक भागीदारीची घोषणा बुधवारी केली.

संबंधित व्यवसायात उभय कंपन्यांची ५०: ५० या प्रमाणात भागीदारी राहणार असून, दुग्धजन्य पदार्थ निर्मितीतील पहिले उत्पादन येत्या वर्षांच्या मध्यापर्यंत बाजारात आणण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

फ्युचर समूहाची उपकंपनी फ्युचर कन्झ्युमर आणि फॉन्टेरा या दरम्यानच्या व्यावसायिक भागीदारीची घोषणा बुधवारी मुंबईत फ्युचर समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बियाणी यांच्या उपस्थितीत करण्याच आली.

न्यूझीलंडच्या फॉन्टेराची यापूर्वी भारतात ब्रिटानियाबरोबर व्यावसायिक भागीदारी होती. सहा वर्षांतच ती संपुष्टात आली. फ्युचर समूह आपल्या निलगिरी या नाममुद्रेद्वारे सध्या दुग्ध व्यवसायात आहे. हा व्यवसाय १५० कोटी रुपयांच्या उलाढालीचा आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Future group in milk business
First published on: 09-08-2018 at 04:02 IST