आपल्या दैनंदिन आयुष्यावर तंत्रज्ञानाचा खूप मोठा प्रभाव पडला आहे. नियमित देयकांचा भरणा ऑनलाइन करण्यापासून, वाणसामानाची खरेदी ते टॅक्सी भाडय़ाने घेण्यापर्यंत आणि सार्वजनिक पातळीवर कनेक्ट होण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही तंत्रज्ञानामुळेच शक्य झाली आहे. अभिजनवर्गाची उत्पादनं आणि सेवा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देऊन तंत्रज्ञानाने सर्वाना समान पातळीवर आणलं आहे. गुंतवणुकीबाबतचा सल्ला पैशापासरी उपलब्ध असल्याने सामान्यत: उच्च मत्ता असणाऱ्या व्यक्तींची मक्तेदारी बनली आहे. या मंडळींना समíपत पोर्टफोलिओ मॅनेजर्सची सेवा परवडू शकते. पण याबाबतीतही आता बदल घडत आहे.

गेल्या २-३ वर्षांत एकंदरीत वित्तीय सेवा क्षेत्रात तंत्रज्ञान अवलंबित्वाने केवळ भारतातच नाही तर जगभरात लक्षणीय उसळी घेतली आहे. हे दोन कारणांमुळे शक्य झालं आहे :

१) सध्या या क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी गुंतवणूकदारांची, विशेषत:  छोटय़ा गुंतवणूकदारांची नेमकी मागणी पूर्ण करू शकलेले नाहीत

२) तंत्रज्ञानामुळे तज्ज्ञ सल्ला आणि सुविधा यांना एकत्र आणणं शक्य झालं आहे.

याच पाश्र्वभूमीवर ‘रोबो अ‍ॅडव्हायजरी’ ही तंत्रज्ञानसुलभ सल्लागार पद्धतीचा उदय झालेला दिसतो. जागतिक अनुभवापासून धडा घेत, भारतात सध्या ज्या पद्धतीने गुंतवणूक केली जाते तीत रोबो अ‍ॅडव्हायझरीमुळे आमूलाग्र बदल घडणे अपेक्षित आहे.

गुंतवणूकदारांना हे कशी मदत करतं?

विकसित देशांच्या विपरित भारतातला गुंतवणूक अनुभव अत्यंत वेगळा आहे. तो पुढील आकडय़ांमधून प्रतििबबित होतो. भारतीय कुटुंबांच्या एकूण मालमत्तेत समभागांतील गुंतवणुकीचे प्रमाण केवळ  दोन टक्के इतके आहे. याला  अनेक कारणेही आहेत. एक तर छोटय़ा गुंतवणूकदारांच्या मनांतील भीती-गैरसमज दूर करून त्यांच्या सहभागाकडे सामान्यपणे  दुर्लक्षच केले गेले. समभागांमधली गुंतवणुकीतील जोखीम, उच्च सेवा दर, कामाकाजातील मर्यादा, तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव हीही कारणे आहेत.

या सर्वावर  प्रभावीपणे आणि सक्षमतेने तोडगा काढण्याची क्षमता रोबो अ‍ॅडव्हायझरीमध्ये आहे. पद्धतशीर आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीमुळे समभागांमधल्या गुंतवणुकीतला लोकांचा सहभागही वाढणे अपेक्षित आहे.

एका सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदाराच्या गरजा, मग तो पगारदार असो वा व्यावसायिक, अत्यंत प्राथमिक आणि सोप्या असतात. माझा पसा मी कुठे गुंतवू? दुर्दैवाने त्याच्यासाठी नेमक्या सेवा आणि उत्पादनं उपलब्ध नाहीत किंवा ज्या उपलब्ध आहेत त्या फारच किचकट आहेत. या कारणामुळेच गुंतवणूकदार हा भांडवली बाजारापासून दूर राहिला आहे.

रोबो अ‍ॅडव्हायझरीमुळे गोष्टी अधिक सोप्या राहतील : साधी उत्पादनं, साधी अंमलबजावणी आणि पाठपुराव्यातही सुलभता येईल.

व्यवस्थेतल्या सर्वात तळातल्या घटकापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असलेल्या रोबो अ‍ॅडव्हायझरीसारखे धडाकेबाज आणि सहज गाठता येण्यासारखं व्यासपीठ निर्माण होणे काळाची गरजच आहे. रोबो अ‍ॅडव्हायझरीचं यशापयश हे अर्थातच या घटकांना दिल्या जाणाऱ्या तज्ज्ञ सल्ल्याच्या परिणामांशी थेटपणे संबंधित आहे. काही प्रश्न विचारण्यापेक्षा गरज लक्षात घेणं हे अत्यंत आव्हानात्मक आहे. सल्ला, साधेपणा, कामकाजातली कार्यक्षमता, अंमलबजावणी याबाबत यूजरला येणाऱ्या अनुभवावरच त्याचं यश अवलंबून आहे.

(लेखक एडेल्वाइज फायनान्शियल सíव्हसेसचे सल्लागार विभाग प्रमुख आहेत)

रोबो अ‍ॅडव्हायझरी म्हणजे काय?

रोबो अ‍ॅडव्हायझरीचं स्वरूप त्याच्या नावातूनच स्पष्ट होतं. हे आíथक आणि गुंतवणुकीबाबत सल्ला देणारं स्वयंचलित व सानुकूलित केलं गेलेलं व्यासपीठ आहे. विविध आíथक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी गुंतवणूकदाराने केलेल्या गुंतवणुकीचा अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल, याचा सल्ला देण्याचं काम हे ऑनलाइन व्यासपीठ करतं. थोडक्यात सांगायचं तर, प्रत्यक्ष कृतीचं एक सोपं व्यासपीठ याद्वारे गुंतवणूकदाराला उपलब्ध करून दिले गेले आहे. हे व्यासपीठ, तज्ज्ञ सल्ला, दृष्टिकोन आणि साधेपणा यांचा संयोग असतो. हा संयोग जितका उत्तम तितका त्या रोबो अ‍ॅडव्हायझरीचा स्वीकार आणि विश्वासार्हता जास्त. जागतिक पातळीवर, अनेक पारंपरिक पद्धतीने काम करणारे अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाकडे वळत आहेत.

हे कसं काम करतं?

हे व्यासपीठ सर्वप्रथम गुंतवणूकदाराची जोखीम पत्करण्याची क्षमता, त्याची मानसिकता समजून घेते. त्याप्रमाणे त्याला साजेसा गुंतवणूक पर्याय सुचविले जातात. तज्ज्ञांच्या तर्कावर आधारित सल्ल्याचे हे संगणकीय प्रमेये व प्रमाणांमध्ये (अल्गोरिदममध्ये) बसविलेले गेलेले रूप आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोप्या भाषेत, सामान्य गुंतवणूकदारांनाही समजेल अशी आहे. जोडीला हे व्यासपीठ – १) पोर्टफोलिओची निर्मिती २) व्यवहारांची नोंद ठेवणं आणि ३) पोर्टफोलिओच्या कामगिरीचा नियत आढावा आणि विश्लेषणाची मुभा देते  गुंतवणूकदाराला सर्व माहिती अद्ययावत स्तरावर आणि ती अधिकाधिक पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून दिली जाते.