सलग दुसऱ्या वर्षांत दरांमध्ये फिके पडणाऱ्या मौल्यवान धातूने २०१४ मध्ये गुंतवणूकदारांना या क्षेत्रातील गुंतवणूक लाभदायक नसल्याचा प्रत्यय दिला. या वर्षांत सोन्यातील दर वार्षिक तुलनेत १० टक्क्यांनी तर चांदीचे मूल्य तब्बल २० टक्क्यांनी रोडावले आहे.
सरकारच्या तिजोरीवरील भार ठरणाऱ्या चालू खात्यावरील तुटीला वेसण घालण्यासाठी केंद्रातील जुन्याप्रमाणे नव्या सरकारनेही मौल्यवान धातूच्या आयातीवर र्निबध कायम ठेवले. तसेच त्यावरील शुल्कही वधारते ठेवले. विविध उपाययोजना राबवून रिझव्‍‌र्ह बँकेनेही वेळोवेळी त्याला साथ दिली.
२०१३च्या अखेरीस तोळ्यासाठी ३० हजार रुपयांपुढे असणाऱ्या सोन्याच्या किमती २०१४ मध्ये सरासरी २६ हजार रुपयांवर आल्या. तर चांदीचा किलोचा भावही या वर्षांत ३६ हजार रुपयेच नोंदला गेला. वर्षभरापूर्वी तो ४४ हजार रुपये होते.
वेगाने धावणाऱ्या भांडवली बाजारामुळे धातूतील गुंतवणूक दुर्लक्षित झाल्याचेही मानले जाते. या वर्षांतील गुढीपाडवा, दसरा तसेच दिवाळीसारख्या सणांना दर कमी असूनही खरेदीकरिता उठाव नव्हता.
जानेवारी २०१४ मध्ये १० ग्रॅमसाठी २९,८०० रुपयांच्या जवळपास असणारे सोने दर वर्षभरात ३०,७९५ रुपयांपर्यंतच पोहोचू शकले. हा टप्पा ३ मार्च रोजी होती. त्यानंतर ते याच महिन्यात २६ हजार रुपये या वर्षांतील नीचांकावरही आले.
पांढरा धातू जानेवारी २०१४ दरम्यान किलोसाठी ५० हजार रुपयांवर होता. वर्षअखेपर्यंत तो ३७ हजार रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षांत चांदीच्या दराने किलोसाठी सरासरी ४४,२३० रुपये भाव अनुभवला आहे.
(पीटीआय : आर. एस. उपलेकर, व्ही. एम. प्रभुणे)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onसोनेGold
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold loses sheen to import curbs in 2014 smugglers make hay
First published on: 26-12-2014 at 12:59 IST