scorecardresearch

Premium

Gold- Silver Price Today : अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणार आहात! महाराष्ट्रात एक तोळं सोन्याची किंमत किती? जाणून घ्या

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

gold-jewellery
आजचा सोने-चांदीचा भाव (फोटो: Reuters)

Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४८,५५० प्रति १० ग्रॅम इतकी आहे. तर २४ कॅरेट १० ग्रम सोन्याची किंमत ५२,९७० रुपये इतकी आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात किलोमागे ५०० रुपयांची घसरण झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,५६० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,९७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,४२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५३,०२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,६२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५३,०२० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३५ रुपये आहे.

gold price today
Gold-Silver Price on 6 October 2023: ग्राहकांसाठी मोठी बातमी! १० ग्रॅम सोन्याचा भाव आता…
Gold-Silver Price
Gold-Silver Price on 5 October 2023: दसऱ्यापूर्वीच बाजारात होणार लूट! सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा मुंबईसह तुमच्या शहरातील दर
Gold Silver Price
Gold-Silver Price on 22 September 2023: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या भाव खालच्या स्तराला, १० ग्रॅमचा दर ऐकून बाजारात गर्दी
Gold Silver Price
Gold-Silver Price on 21 September 2023: महिनाभरानंतर सोने पुन्हा ६० हजारांच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या आजचे झटपट दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gold silver prices continue to fall what is the price of 10 gram gold in maharashtra today 30 april 2022 rmt

First published on: 30-04-2022 at 10:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×