‘जीएसटी परिषदे’ची श्रीनगरमध्ये २८ जूनला बैठक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या जीएसटी परिषदेची ४७ वी बैठक, चालू महिन्यात २८ आणि २९ जून श्रीनगर येथे पार पडेल, अशी ट्विटरच्या माध्यमातून अर्थ मंत्रालयाने घोषणा केली.

‘जीएसटी परिषदे’ची श्रीनगरमध्ये २८ जूनला बैठक
संग्रहित छायाचित्र

पीटीआय, नवी दिल्ली : एकीकडे वस्तू आणि सेवाकराचे दरमहा वाढते संकलन, तर दुसरीकडे वाढत्या महागाईच्या दबावामुळे उद्योग-व्यवसायांच्या नफ्यावर होणारा प्रतिकूल परिणाम अशा दोलायमान परिस्थितीतून अर्थव्यवस्थेचे मार्गक्रमण सुरू असताना, या परिस्थितीवर संतुलित उपायाचा मार्ग शोधणाऱ्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची महत्त्वाची बैठक २८ आणि २९ जून रोजी पार पडणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या जीएसटी परिषदेची ४७ वी बैठक, चालू महिन्यात २८ आणि २९ जून श्रीनगर येथे पार पडेल, अशी ट्विटरच्या माध्यमातून अर्थ मंत्रालयाने घोषणा केली. जीएसटी परिषदेच्या आगामी बैठकीत ऑनलाइन गेिमग, कॅसिनो आणि घोडय़ांच्या शर्यतीवर वस्तू आणि सेवा कराचा दर ठरविण्यासाठी नेमलेल्या मंत्रिगटाने सध्याच्या १८ टक्क्यांच्या कर आकारणीच्या पुनरावलोकन अहवालावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने गेल्या महिन्यात विविध प्रकारचे ऑनलाइन खेळ, कॅसिनो आणि घोडय़ांची शर्यत या सेवांवरील कर सर्वोच्च श्रेणीत म्हणजेच २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस एकमताने केली आहे. बैठकीत कररचनेच्या सुलभीकरणाच्या संदर्भात आणि जीएसटीची तंत्रज्ञान प्रणाली अधिक प्रभावी करण्यावरही चर्चा होणे अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
निर्देशांकांचा वर्षांतील नीचांकी तळ ; सेन्सेक्समध्ये १,०४५ अंशांची झड
फोटो गॅलरी