दुचाकी निर्मिती क्षेत्रातील होन्डा मोटरसायकल अॅन्ड स्कूटर्स इंडिया कंपनीने भारतात थेट विदेशी गुंतवणूक विस्तारण्यात आलेल्या रिटेल क्षेत्रात  शिरकाव केला आहे. स्वीडिश फॅशन कंपनीच्या साहाय्याने होन्डाने सिंगल बॅ्रन्डेड रिटेल दालन व्यवसायात सरकारची परवानगी मिळविली आहे.
हेन्स अॅन्ड मॉरिट्झसह (एच अॅन्ड एम) होन्डाला भारतात रिटेल दालन सुरू करण्यास औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सचिव सौरभ चंद्र यांनी मान्यता दिल्याचे सांगितले. यानुसार होन्डा कंपनी स्वीडिश कंपनीच्या दालनांमध्ये दुचाकी व तिचे सुटे भाग विक्री व प्रदर्शनासाठी उपलब्ध करेल.
तूर्तास वाहन उत्पादक कंपन्या फ्रॅन्चाईजीमार्फत सुटय़ा भागांची विक्री करतात. होन्डा हीदेखील जपानच्या समूह कंपनीची उपकंपनी आहे. कंपनीने अशी ५० दालने सुरू करण्यासाठी ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे, तर स्वीडनमधील एच अॅन्ड एमची विविध ४९ देशांमध्ये २,८०० दालने आहेत. १९४७ ची स्थापना असलेल्या या कंपनीची एच अॅन्ड एम होम, चिप मंडे, विकएन्ड, मॉन्की आदी नावाने दालन साखळी आहे.
रिटेल क्षेत्रात विदेशी कंपन्यांना भारताची कवाडे मोठय़ा प्रमाणात खुली करण्यात आल्यानंतर आयकिया या फर्निचर कंपनीने देशात १०,५०० कोटी रुपये अशी या क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करण्याचे योजिले आहे.