How to update KYC of EPF account online? Know the complete process and benefits | Loksatta

EPF खात्याचं केवायसी ऑनलाइन अपडेट कसं करायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे

भारत सरकारने पीएफ खात्यांची केवायसी करणे अनिवार्य केले आहे. या अंतर्गत ईपीएफ धारकांना आपल्या अकाउंटला आधारसह अन्य काही दस्तऐवज लिंक करणे अतिशय आवश्यक आहे.

EPF खात्याचं केवायसी ऑनलाइन अपडेट कसं करायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे
ईपीएफ धारकांना आपल्या अकाउंटला आधारसह अन्य काही दस्तऐवज लिंक करणे अतिशय आवश्यक आहे. (Financial Express)

भारत सरकारने पीएफ खात्यांची केवायसी करणे अनिवार्य केले आहे. या अंतर्गत ईपीएफ धारकांना आपल्या अकाउंटला आधारसह अन्य काही दस्तऐवज लिंक करणे अतिशय आवश्यक आहे. मात्र यासाठी चिंता करण्याची गरज नाही. ईपीएफओने आपल्या सर्व खातेधारकांसाठी काही खास फीचर्स सादर केले आहेत. या फीचर्सच्या मदतीने तुम्ही कधीही आणि कुठूनही आपल्या ईपीएफ खात्याचे केवायसी अपडेट करू शकता.

ईपीएफ खात्याचे केवायसी अपडेट करण्याचे फायदे :

ईपीएफ खात्याचे केवायसी अपडेट करणे अनिवार्य असले, तरी त्याचे फायदेही अनेक आहेत. जर तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्याचे केवायसी अपडेट केले नसेल तर तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये तुम्हाला ईपीएफ खात्याशी संबंधित ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येणार नाही. केवायसी अपडेट केल्याशिवाय तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही किंवा ई-नामांकन फाइल करू शकत नाही. याशिवाय तुम्ही तुमचे पीएफ खाते ट्रान्सफरही करू शकत नाही.

पीएफ खात्याचे केवायसी कसे अपडेट करावे?

  • सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ला भेट द्या.
  • आता तुमचा १२ अंकी युएएन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
  • लॉगिन केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. त्याच्या शीर्षस्थानी एक हिरव्या बारमध्ये तुम्हाला ‘मॅनेज’ लिहिलेले दिसेल.
  • ‘मॅनेज’वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील. यामध्ये केवायसीचा एक पर्यायदेखील असेल. यावर क्लिक करा.
  • केवायसीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. आता समोरील चेक बॉक्सवर क्लिक करून तुमच्याकडे असलेल्या सर्व कागदपत्रांचे तपशील भरा. यामध्ये आधार, बँक आणि पॅन कार्डचे तपशील भरणे अनिवार्य आहे.
  • सर्व तपशील भरल्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा.
  • सेव्ह केल्यानंतर, तुमचे सर्व तपशील तुमच्या नियोक्त्याकडे मंजुरीसाठी पाठवले जातील. त्यानंतर तुमचा नियोक्ता त्यास मान्यता देईल आणि तुमचे केवायसी तपशील यशस्वीरित्या अपडेट केले जातील.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Gold-Silver Price on 3 October 2022: ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या दरांमध्ये आजही वाढ नाही; जाणून घ्या किंमत

संबंधित बातम्या

Best Recharge Plan: मस्तच! ३९५ रुपयांमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचा लाभ घ्या; तीन महिन्याच्या वैधतेसह उपलब्ध
महागाईचा सहिष्णू दर २ ते ६ टक्के!
Google Maps चालणार इंटरनेटशिवाय; जाणून घ्या, नकाशे ऑफलाइन डाउनलोड करण्याची सोपी पद्धत
सावधान! ‘Google Chrome’ वापरताय? तर तुम्ही संकटात आहात, सरकारकडूनही इशारा
नोकियाच्या सर्वात स्वस्त टॅबलेटची बाजारात एंट्री; 8200mAh बॅटरीसह मिळतील ‘हे’ जबरदस्त फीचर्स, लगेच पाहा किंमत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन सहकारी ठार
FIFA World Cup 2022: पोलंडचा सौदी अरेबियावर विजय; लेवांडोवस्कीची चमक
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!
India vs NZ 2nd ODI: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात