मुंबई : चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत १.५९ कोटींहून अधिक करदात्यांना १.५४ लाख कोटी रुपयांहून अधिक प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने गुरुवारी दिली. यामध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी (करनिर्धारण वर्ष २०२१-२२) १.२ कोटी करदात्यांना दिलेल्या २३,४०६.२८ कोटी रुपयांचा परतावादेखील समाविष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) प्राप्तिकर परताव्याच्या प्रक्रियेअंतर्गत १ एप्रिल २०२१ ते १० जानेवारी २०२२ पर्यंत १.५९ कोटी करदात्यांना १,५४,३०२ कोटी रुपयांहून अधिक परतावा जारी केला गेला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने ट्वीटद्वारे दिली. सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, १.५६ कोटींहून अधिक करदात्यांना ५३,६८९ कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर परतावा मिळाला आहे. यासह कंपनी कराच्या बाबतीत २.२१ लाखांहून अधिक प्रकरणांमध्ये एक लाख कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax return cbdt issues rs 1 54 lakh crore refunds to taxpayers zws
First published on: 14-01-2022 at 02:59 IST