आयकर भरणारे आता मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी ई-फायलिंग पोर्टलवर आयकर रिटर्न भरू शकतात. जेव्हा तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर ऑनलाइन भराल, तेव्हा तुम्हाला तेथे दोनपैकी कोणताही एक फॉर्म निवडण्याचा पर्याय मिळेल. आयटीआर फॉर्म-१ आणि आयटीआर फॉर्म-४, यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडावा लागेल. बहुतेक करदाते या फॉर्मचा वापर करून त्यांचे कर भरतात. या फॉर्ममधील बहुतांश माहिती आधीच भरलेली असते जी करदात्याला पडताळून पाहावी लागते. याशिवाय चुकीची माहिती असल्यास ती दुरुस्त करावी लागते.

आयटीआर फॉर्म-१ कोणी भरावा?

ज्यांचे पगार, मालमत्ता, व्याज आणि कृषी उत्पन्न यासह एकूण उत्पन्न ५० लाखांपर्यंत आहे, अशा लोकांना हा फॉर्म भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला पगारातून मिळणारे उत्पन्न, घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न, व्याजातून मिळणारे उत्पन्न, लाभांशातून मिळणारे उत्पन्न याची माहिती जाहीर करावी लागेल. या व्यतिरिक्त कोणत्याही मार्गाने तुमचे उत्पन्न येत असल्यास, तुम्ही आयकर रिटर्न भरण्यासाठी हा फॉर्म वापरू शकत नाही.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

Income Tax Return : वर्ष २०२२-२३ साठी लवकरात लवकर भरा ITR; अन्यथा भरावा लागेल दंड; जाणून घ्या शेवटची तारीख

आयटीआर फॉर्म-४ कोणी भरावा?

तुमचे वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुमचे उत्पन्न कलम ४४एडी, ४४एडीए किंवा ४४एडीई मध्ये गणना केल्यानुसार व्यवसाय आणि व्यवसायातून असेल, तर तुम्हाला आयटीआर फॉर्म-१ भरण्याची गरज नाही. तुम्हाला आयटीआर फॉर्म-४ निवडून तुमचा आयटीआर फाइल करावा लागेल.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर दाखल करण्यासाठी, तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म १६, बँक खात्याचे तपशील, गुंतवणुकीचे तपशील आणि पुरावे आणि इतर उत्पन्नाचे पुरावे असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन आणि आधार लिंक करणेही आवश्यक आहे. करदात्याचा ई-मेल आयडी देखील आयकर विभागाकडे नोंदणीकृत असावा.