भाज्याच्या किमतीत थेट ५० टक्क्यांनी वाढ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : चालू वर्षांच्या सुरुवातीलाच महागाई दर गेल्या सहा वर्षांच्या वरच्या टप्प्यावर झेपावला आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे जानेवारी २०२० मधील किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ७.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

यापूर्वी मे २०१४ मध्ये महागाई दर ८.३३ टक्के अशा वरच्या टप्प्यावर होता. महागाई निर्देशांकातील अन्नधान्याच्या गटवारीतील महागाई दर १३.६३ टक्के आहे. भाज्या, डाळी तसेच मांसाहारी पदार्थाच्या किमतींचा भार महागाई निर्देशांकावर पडला आहे. वर्षभरापूर्वी अन्नधान्याच्या महागाईचा दर उणे स्थितीत होता. तर भाज्यांच्या किमती यंदाच्या जानेवारीत थेट ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. डाळींचे दर १७ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थही दुहेरी अंकापर्यंत वाढले आहेत.

एकूण महागाई निर्देशांकातील अन्नधान्याची किंमतवाढ लक्षणीय आहे. गेल्या महिन्यात भाज्यांच्या किमती ५०.१९ टक्क्यांनी तर डाळींचे दर १६.७१ टक्क्यांनी वाढले आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian inflation hit a near six year high in january zws
First published on: 13-02-2020 at 03:57 IST