बजाज समूहाचे प्रेरणास्थान स्व. कमलनयन बजाज यांचे यंदाचे वर्ष हे जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्ताने  येत्या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शुक्रवार, २३ जानेवारीपासून स्व. बजाज यांच्या जन्मशताब्दी वर्षांला प्रारंभ होत असून यानिमित्ताने ‘कमलनयन बजाज : बजाज समूहाचे शिल्पकार’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. पिरामल समूहाच्या गीता पिरामल लिखित हे स्व. बजाज यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे. याबाबतचा प्रकाशन सोहळा समुहाचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील नरीमन पॉईंट येथील ‘बजाज भवन’मध्ये होईल. यानिमित्ताने याचठिकाणी छायाचित्र प्रदर्शनही होईल. वडील स्व. जमनालाल बजाज यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांनी १९४२ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी बजाज समूहाच्या व्यवसायाची धुरा हाती घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamalnayan bajaj golden jubilee year
First published on: 22-01-2015 at 12:39 IST