Merger IDBI MF LIC Mutual Fund final stage new Multicap Fund ysh 95 | Loksatta

एलआयसी म्युच्युअल फंडात ‘आयडीबीआय एमएफ’चे विलीनीकरण अंतिम टप्प्यात; नवीन ‘मल्टिकॅप फंडा’ची प्रस्तुती

एलआयसी म्युच्युअल फंड आणि आयडीबीआय म्युच्युअल फंड यांच्यातील विलीनीकरण प्रगतिपथावर असून, ते अंतिम टप्प्यावर असल्याचे एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी टी. एस. रामकृष्णन यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

एलआयसी म्युच्युअल फंडात ‘आयडीबीआय एमएफ’चे विलीनीकरण अंतिम टप्प्यात; नवीन ‘मल्टिकॅप फंडा’ची प्रस्तुती
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

मुंबई : एलआयसी म्युच्युअल फंड आणि आयडीबीआय म्युच्युअल फंड यांच्यातील विलीनीकरण प्रगतिपथावर असून, ते अंतिम टप्प्यावर असल्याचे एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी टी. एस. रामकृष्णन यांनी गुरुवारी स्पष्ट केले. अडचणीत असलेल्या आयडीबीआय बँकेला तारण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने त्या बँकेत बहुसंख्ये हिस्सेदारी मिळविली. आयडीबीआय म्युच्युअल फंडाचे पालकत्व आयडीबीआय बँकेकडे असल्याने पर्यायाने मालकी एलआयसीकडेच येते. त्यामुळे एकाच प्रवर्तकाचे दोन मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक भागभांडवल बाळगता येणार नाही, असे बाजार नियामक ‘सेबी’चे निर्बंध पाहता, एलआयसीने दोन्ही म्युच्युअल फंडांच्या एकत्रीकरणाचा पर्याय अजमावण्याचे ठरविले. त्याचीच कबुली देताना, एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे रामकृष्णन यांनी सुस्पष्टपणे सांगितले. विलीनीकरण प्रक्रियेवर ठामपणे भाष्य करता येईल, तेव्हा ते सर्वाना सूचित केले जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पुढील पाच वर्षांत व्यवस्थापनांतर्गत मालमत्तेत (एयूएम) अव्वल १० फंड घराण्यांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य साधण्यासाठी विशेष पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या व्यवस्थापनाखालील १८,००० कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेसह देशातील २२ वे मोठे फंड घराणे असलेल्या एलआयसी म्युच्युअल फंडाने नवीन ‘मल्टिकॅप फंड’ प्रस्तुत केला. ही गुंतवणुकीस कायम खुली (ओपन-एंडेड) समभागसंलग्न योजना असून, जी सर्व बाजार भांडवल श्रेणीतील समभागांमध्ये गुंतवणूक करेल. फंडातून लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये प्रत्येकी किमान २५ टक्के गुंतवणूक केली जाईल. नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) गुरुवार, ६ ऑक्टोबर २०२२ रोजी गुंतवणूकदारांसाठी खुली होईल आणि गुरुवार, २० ऑक्टोबर २०२२ रोजी ती बंद होईल. ही योजना बुधवार, २ नोव्हेंबर २०२२ पासून निरंतर खरेदी-विक्री व्यवहारांसाठी पुन्हा खुली होईल. या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी योगेश पाटील हेच या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
प्रमुख क्षेत्रांची वाढ खुंटली!; ऑगस्टमध्ये वाढीचा दर ३.३ टक्क्यांवर

संबंधित बातम्या

विरोधाभास: गरीब सोनं गहाण ठेवतायत, श्रीमंत विकत घेतायत; आयातीत २०० टक्क्यांची वाढ
Gold-Silver Price on 20 July 2022: महाराष्ट्रातील आजचा सोने-चांदीचा भाव जाणून घ्या
एअरटेलची ‘५ जी’ ग्राहकसंख्या दहा लाखांवर
बँक कर्मचाऱ्यांचा १९ नोव्हेंबररला संप; एटीएममध्ये खडखडाट होण्याची शक्यता

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती