नवी दिल्ली : रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे अमेरिकेसह युरोपीय देशांकडून रशियाच्या पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. मात्र पाश्चात्त्य देशांनी रशियावरील तेल आयातीवर निर्बंध लादल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे घातक परिणाम होतील. खनिज तेलाच्या किमती िपपामागे ३०० डॉलरचा स्तरही गाठतील, असा इशारा रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी मंगळवारी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेसह युरोपीय देशांनी रशियावर विविध मार्गानी आर्थिक निर्बंध लादले आहेत. आता रशियाकडून होणाऱ्या तेल निर्यातीवर निर्बंध लादल्यास जागतिक पातळीवर तेलाच्या पुरवठय़ात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. एकटय़ा रशियाचा जागतिक खनिज तेल पुरवठय़ात १० टक्के वाटा असल्याने निर्बंध आणल्यास जागतिक पातळीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. जुलै २००८ नंतर प्रथमच खनिज तेलाच्या किमती १३० डॉलर प्रतिपिंपावर पोहोचल्या आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oil prices may surge past 300 doller per barrel zws
First published on: 09-03-2022 at 03:58 IST