मुंबई : एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा रोशनी नाडर मल्होत्रा यांनी भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून सलग दुसऱ्या वर्षी स्थान कायम राखले असून, २०२१ मध्ये त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ५४ टक्क्यांनी वाढ होऊन ती ८४,३३० कोटी रुपयांवर गेली आहे.कोटक प्रायव्हेट बँकिंग आणि हुरुन यांनी संयुक्तपणे बुधवारी प्रकाशित केलेल्या सूचीत, दशकभरापूर्वी सौंदर्य-प्रसाधनेकेंद्रित ब्रँड नायका सुरू करणाऱ्या फाल्गुनी नायर यांनी स्व-निर्मित ५७,५२० कोटी रुपयांच्या नक्त मत्तेसह पहिल्या पिढीच्या सर्वात श्रीमंत महिला उद्योजिका म्हणून यावर्षी स्थान मिळविले आहे. नायर यांच्या संपत्तीत वर्षभरात तब्बल ९६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि एकंदरीत सूचीतही त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बायोकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ यांच्या संपत्तीत २१ टक्क्यांची घसरण झाली आहे आणि २९,०३० कोटी रुपयांच्या संपत्तीसह एका क्रमांकाने खाली घसरून त्या देशातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात जन्मलेल्या किंवा वाढलेल्या आणि सक्रियपणे व्यवसाय व्यवस्थापित करत आहेत अशा १०० धनाढय़ महिलांच्या यादीत समावेश आहे. या १०० महिलांची एकत्रित संपत्ती सरलेल्या २०२१ या एका वर्षांत ५३ टक्क्यांनी वाढून ४.१६ लाख कोटी रुपये झाली आहे, जी २०२० मध्ये २.७२ लाख कोटी रुपये होती.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roshni nadar remains richest indian woman entrepreneur zws
First published on: 28-07-2022 at 03:19 IST