s p retains india s gdp growth at 7 3 percent for fiscal year 2022 23 zws 70 | Loksatta

विकासदराच्या ७.३ टक्के अंदाजावर ‘एस अँड पी’ ठाम

चालू आर्थिक वर्षांसाठी आजवर अर्थविश्लेषक व प्रतिष्ठित अर्थसंस्थांकडून व्यक्त केल्या गेलेल्या अंदाजात, ‘एस अँड पी’चाच ७.३ टक्क्यांचा अंदाज हा सर्वाधिक आहे.

विकासदराच्या ७.३ टक्के अंदाजावर ‘एस अँड पी’ ठाम
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : अलीकडे आशियाई विकास बँक आणि फिचने चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसंबंधी पूर्वानुमानात लक्षणीय कपात करून ते सात टक्क्यांपर्यंत खाली आणणारे सुधारित अंदाज जाहीर केले असले, तरी जागतिक प्रतिष्ठेच्या ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने सोमवारी विकासदराचा ७.३ टक्क्यांचा आधी व्यक्त केलेला अंदाज कायम ठेवत असल्याचे जाहीर केले. विद्यमान २०२२ च्या अखेपर्यंत महागाई दर सहा टक्क्यांच्या उच्च अशा तापदायक पातळीवर राहण्याची शक्यता या पतमानांकन संस्थेने वर्तविली आहे.

मागील वर्षी (२०२१-२२) सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये ८.७ टक्के वाढ साधणारी, भारतीय अर्थव्यवस्थेचा एप्रिल-जून २०२२ तिमाहीत १३.५ टक्के दराने विस्तार झाला आहे. चालू आर्थिक वर्षांसाठी आजवर अर्थविश्लेषक व प्रतिष्ठित अर्थसंस्थांकडून व्यक्त केल्या गेलेल्या अंदाजात, ‘एस अँड पी’चाच ७.३ टक्क्यांचा अंदाज हा सर्वाधिक आहे. किंबहुना तो रिझव्‍‌र्ह बँकेच्या ७.२ टक्क्यांच्या अनुमानापेक्षा जास्त आहे व सप्ताहअखेर नियोजित द्विमासिक आढाव्याच्या बैठकीअंती रिझव्‍‌र्ह बँकेकडूनही विकासदराचा अंदाज कमी केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विकासदरासंबंधी वेगवेगळे कयास..

एस अँड पी रेटिंग्ज      –      ७.३ टक्के

रिझव्‍‌र्ह बँक     –       ७.२ टक्के

आशियाई विकास बँक    –      ७ टक्के

फिच रेटिंग्ज     –      ७ टक्के

इंडिया रेटिंग्ज    –      ६.९ टक्के

स्टेट बँक       –      ६.८ टक्के

सिटीग्रुप        –      ६.७ टक्के

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
रुपया ८१.६७ नीचांकपदी ; जगातील सर्वच प्रमुख चलनांची डॉलरपुढे नांगी

संबंधित बातम्या

सोने-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण; खरेदीची ठरू शकते योग्य वेळ
Gold-Silver Price on 29 July 2022: जाणून घ्या, आजचा सोने-चांदीचा भाव
Gold-Silver Price on 10 October 2022: ग्राहकांसाठी चांगली बातमी; सोने-चांदीच्या दरांमधील घसरण कायम

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द