मुंबई : मुंबईस्थित वित्तीय सेवा देणाऱ्या सॅम्को सिक्युरिटीजने आपल्या म्युच्युअल फंड वितरणाचा भाग असलेल्या रँक म्युच्युअल फंडाच्या मंचावर बुधवारपासून ‘स्मार्ट एसआयपी’ची सेवा सुरू केली गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही वर्षांत ‘एसआयपी’चा पर्याय गुंतवणूकदारांत चांगलाच लोकप्रिय झाला आहे. बाजार गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या टप्प्यांत असतो. सर्व काळी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकत नाही. म्हणून 5गुंतवणूक पहिल्यांदा लिक्विड फंडात घेऊन बाजाराच्या परिस्थितीनुसार शून्य ते १०० टक्के गुंतवणूक निश्चित केलेल्या समभागसंलग्न फंडात गुंतविण्याची सुविधा या ‘स्मार्ट एसआयपी’अंतर्गत उपलब्ध केली गेली आहे, असे सॅम्को सिक्युरिटीजचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जीमित मोदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रँक म्युच्युअल फंडाचे प्रमुख ओंकेश्वर सिंग म्हणाले, गुंतवणुकीतून मानवी भावनांचा अडसर दूर करून ‘सुरक्षित गुंतवणूक’ ही संकल्पना अस्तित्वात आणली गेली आहे. विश्लेषणाअंती मोजके ३३० फंड गुंतवणुकीसाठी निवडले गेले असून बाजार मूल्यांकनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांनुसार शून्य ते ३५ टक्के गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध केला गेला आहे. बाजार चक्राचा पूर्ण फायदा घेण्यासाठी ‘स्मार्ट एसआयपी’त किमान पाच वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samco securities to launches smartsip zws
First published on: 23-08-2019 at 02:14 IST