स्मार्टफोनच्या बाजारातील अग्रणी सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्सने ‘सॅमसंग गॅलॅक्सी जे ३’ हा तिचा संपूर्णपणे भारतात घडविलेला पहिला फोन बाजारात आणत असल्याची घोषणा केली. खास दुचाकी स्वारांसाठी या फोनची रचना करण्यात आली असल्याचे कंपनी सांगते. यात ‘एस बाइक मोड’ अशी व्यवस्था असून, दुचाकी बसण्यापूर्वी तो अॅक्टिव्हेट केल्यास, कॉल करणाऱ्याला स्वयंचलितरीत्या ‘वापरकर्ता सध्या दुचाकीवर स्वार आहे आणि तो तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही’ असा संदेश दिला जातो. सॅमसंगच्या गॅलॅक्सी श्रेणीतील अन्य फोनसारखी वैशिष्टय़ेही या स्मार्टफोनमध्ये सामावली आहेत. गॅलॅक्सी जे ३ ची किंमत ८,९९० रुपये किमतीत, गोल्ड, काळा व पांढरा अशा रंगांमध्ये फक्त स्नॅपडीलवर उपलब्ध करणारांत आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2016 रोजी प्रकाशित
सॅमसंगचा पहिलावहिला ‘मेड इन इंडिया’ फोन दाखल
गॅलॅक्सी जे ३ ची किंमत ८,९९० रुपये किमतीत, गोल्ड, काळा व पांढरा रंगांमध्ये स्नॅपडीलवर उपलब्ध आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-04-2016 at 06:35 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung first make in india phone