आघाडीच्या एसबीआय म्युच्युअल फंडाने आपल्या मुदत बंद (क्लोज एंडेड) प्रकाराच्या ‘एसबीआय डय़ुएल अ‍ॅडव्हान्टेंज फंडा’ची मालिका दुसरी विक्रीला खुली केली आहे. कर्जरोख्यांवर गुंतवणूक केंद्रीत असलेला हा हायब्रीड धाटणीचा ३६ महिने मुदतीचा फंड आहे.
मध्यम स्वरूपाची जोखीम घेऊन कर कार्यक्षम गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल. या फंडातून ५०टक्के ते ९५ टक्के इतकी गुंतवणूक डेट पर्यायांमध्ये म्हणजे उपलब्ध उच्च गुणवत्तेच्या रोख्यांमध्ये केली जाईल, तर शून्य ते २५ टक्के मनी मार्केट पर्यायात तर शक्य झाल्यास ५ टक्के ते २५ टक्के मालमत्ता समभाग आणि समभागसदृश पर्यायात गुंतविली जाईल. या फंडाची विक्री २२ एप्रिलपासून सुरू झाली असून ती ५ मे २०१४ पर्यंत सुरू राहील. किमान ५,००० रुपयांपासून पुढे या फंडात गुंतवणूक करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi dual advantage fund open to sale
First published on: 02-05-2014 at 01:04 IST