पीटीआय, नवी दिल्ली : सरलेल्या आर्थिक वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील फसवणूक व घोटाळय़ांची प्रकरणे वाढून ९,९३३ वर गेली आहेत. यात गुंतलेली रक्कम ४०,२९५.२५ कोटी रुपयांच्या घरात जाणारी आहे. तथापि आधीच्या वर्षांच्या तुलनेत त्यात निम्म्याहून अधिक घट झाली असल्याची माहिती रिझव्‍‌र्ह बँकेकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ग्राहकांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये फसवणुकीत गुंतलेली रक्कम ८१,९२१.५४ कोटी रुपये होती. ती सरलेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ५१ टक्क्यांनी घटली असली तरी फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या मात्र वाढलेली आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेने माहितीचा अधिकारात दाखल एका अर्जाला उत्तर देताना स्पष्ट केले. १ एप्रिल २०१७ पासून रिझव्‍‌र्ह बँकेने एक लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या फसवणुकीच्या प्रकरणांचीदेखील यात नोंद केली आहे. सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षांत आर्थिक गैरव्यवहार, फसवणुकीच्या ९,९३३ प्रकरणांची बँकांकडून नोंद करण्यात आली आहे. मात्र त्याआधीच्या म्हणजेच २०२०-२१ मध्ये एकूण ७,९४० फसवणुकींच्या प्रकरणांची नोंद झाली होती.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scams banks financial public field banks cheating scams cases ysh
First published on: 17-05-2022 at 00:02 IST