भारतीय दूरसंचार उद्योग संभाव्यत: उदारीकरणाच्या सर्वात मजबूत उदाहरणांपकी एक आहे जे समाजाच्या अशा सर्व वर्गाच्या ग्राहकांना एक सूत्रामध्ये गुंफते. ते सांस्कृतिक विकासामध्ये अग्रगण्य भूमिकाही  साकारते. सध्या मोबाईल सेवांच्या वापराच्या स्वरुपामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. हे एक दशकापूर्वीच्या आपल्या आधीच्या स्वरुपापेक्षा बरेच परिवíतत होत चालले आहे. अशाप्रकारे हे निश्चतपणे म्हणता येऊ शकते की भारतीय दूरसंचारच्या कथेने आता विकासाच्या पुढील टप्प्यात प्रवेश केला आहे.
गेली काही वर्षे या क्षेत्राकरिता बरेच अडथळ्यांचे वर्ष राहिले असले तरी यावर्षी ‘स्मार्टफोन्स’चा खोलवर विस्तारदेखील दिसून आला आणि त्याबरोबरच मोबाईल इंटरनेटधारकांच्या संख्येतदेखील मोठी वाढ झाली.
भारतात इंटरनेटला १ कोटीपासून १० कोटीपर्यंत पोहोचण्यामध्ये दशकापेक्षा जास्त काळ लागला. तर १० कोटींहून २०कोटीपर्यंत पोहोचण्यामध्ये केवळ तीन वष्रे लागली. आकडे असे सुचवितात की, २०१५ वर्षांपर्यंत मोबाईल ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे अग्रगण्य माध्यम बनेल, जे एकूण ब्रॉडबँडधारकांच्या ८० टक्क्यांना छताखाली घेईल. जर देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये मोबाईल इंटरनेटच्या वाढीविषयी बोलावे तर हे चित्तवेधक तथ्य आहे.
भारतात इंटरनेटला १ कोटीपासून १० कोटीपर्यंत पोहोचण्यामध्ये दशकापेक्षा जास्त काळ लागला. तर १० कोटींहून २०कोटीपर्यंत पोहोचण्यामध्ये केवळ तीन वष्रे लागली.

 उत्तर प्रदेशात सर्वात जास्त १.४८ कोटी ग्राहक आहेत आणि कमाल संख्येत मोबाईल इंटरनेट जोडण्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र (गोवा सहित)चा क्रमांक आहे. येते १.२६ ग्राहक आहेत १.०३ जोडणीसहआंध्र प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे. हे आकडे मार्च २०१३ च्या शेवटपर्यंतचे आहेत.
३जी/डेटा वापरामध्ये मोठय़ा वाढीने जोर पकडला आहे, म्हणूनच विकासाचा हा टप्पा पहिल्यापेक्षा मोठा झाला आहे. २०११ वर्षांमध्ये या सेवा अशा जास्तीत-जास्त परिमंडळात उपलब्ध होत्या जेथे ऑपरेटर्सकडे ३जी परवाने उपलब्ध होते. वास्तविकत: टाटा टेलिसíव्हसेस पहिला भारतीय खाजगी ऑपरेटर होता, ज्याने नोव्हेंबर २०१० मध्ये सर्व ९ परवाने दूरसंचार परिमंडळात ३जी सेवा दाखल केली. तेव्हापासून मासिक तत्त्वावर कंपनीने डेटा व्हॉल्यूम्समध्ये ३०-५० टक्क्यांच्या वाढीचा अनुभव केला.
डेटा – पुढील वाढीचा कारक
पुढील ३-४ वर्षांमध्ये ३जी जोडणीद्वारे इंटरनेटचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या वाढून २.२ कोटींपर्यंत पोहोचेल. ही दृश्यात्मकता समजण्याकरिता याच्या मागील १७ वर्षांदरम्यान घेण्यात आलेल्या १.५कोटी फिक्स्ड लाईन ब्रॉडबँड कनेक्शन्स बरोबर तुलना करा. नवीन मोबाईल इंटरनेट रिपोर्टनुसार मोबाईल फोन्सवर सरासरी मासिक खर्च ४६० रुपये प्रति महिनाहून कमी ३८७ रुपये प्रति महिना झाला आहे. ही वाढ देशाच्या अर्ध शहरी आणि ग्रामीण क्षेत्राकरिता विशेषकरुन लाभदायी आहे, जेथे ग्राहकांचा कल कॉम्प्युटर आधारित इंटरनेटकडे वाढला आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये वायरलेसधारकांच्या संख्येत महाराष्ट्राने ५० टक्क्यांची वाढ दर्शवली. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, या क्षेत्रामध्ये जास्तीत-जास्त संख्येने ग्राहक मोबाईल डिव्हाईसवर पहिल्यांदा इंटरनेटचा अनुभव घेत आहेत. अशाप्रकारे एकीकडे हा वापरकर्ता हँडसेट अनुभव नाविन्यतेकरिता संभाव्यतांचा शुभारंभ करेल. त्याबरोबरच इंटरनेटची शक्ती व्यक्तिगत डिव्हायसेसच्या माध्यमातून देखील संशोधित केली जाऊ शकेल.
तंत्रज्ञानाचे नेतृत्त्व – नाविन्यतेच्या मार्गावर पडणारी पाऊले
आजच्या युगात जलदतेने वाढत्या तंत्रज्ञान उत्कृष्टतेच्या बाबतीत सेवा प्रदात्यांकरिता हे अत्यंत आवश्यक झाले आहे की, ते नवीन योजना व सेवांसह आपल्या सर्कल्सना सतत संशोधित करतील. गेल्या दशकांमध्ये तंत्रज्ञान प्रादुर्भाव व प्रदान केल्या जाणाऱ्या ध्वनिलहरींच्या विस्ताराने आणखी ग्राहकांना प्रोत्साहित केले, ज्याविषयी आधी विचार केला जाऊ शकत नव्हता. यापुढे जात, नाविन्यपूर्ण अॅप्लिकेशन्स व सेवांच्या प्रसाराला प्रोत्साहन देण्याकरिता दूरसंचार सेवा प्रदात्यांकरिता आपल्या ग्राहकांना उच्च स्तरीय बँडविथ प्रदान केला जाणे आवश्यक झाले आहे. जास्तीत-जास्त धारक जवळजवळ ९५ टक्के संपर्काकरिता स्काइप, व्हॉटस्अप इत्यादींसारख्या थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्सना जलदतेने स्विकारत आहेत. तसेच थर्ड पार्टी वेब कन्टेन्ट समान संख्या आणि यूट्यूब आणि फेसबुक सारख्या सामाजिक नेटवìकग कंपन्या उच्च स्तरीय डेटा ट्रफिकचे कार्यचालन करत आहेत – सध्याच्या भौतिक नेटवर्क आधारभूत संरचनेवर खूपच दबाव पडू लागला आहे. तसेच अतिरिक्त स्पेक्ट्रमची आवश्यकता वाढू लागली आहे. म्हणूनच ऑपरेटर्सकरिता आपल्या क्षेत्रामध्ये ‘लो लॅन्टसी – हायर डेन्सिटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर’ची व्यवस्था समर्पक झाली आहे, ज्यामुळे डिजिटल उपस्थितीच्या विस्ताराला समर्थन प्रदान करणे शक्य होईल आणि ग्राहकांना अत्यंत प्रभावीपणे सेवा उपलब्ध करणे सोपे होईल.
लेखक टाटा टेलिसव्र्हिसेसच्या चलन विभागाचे (मोबाईल) अध्यक्ष आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second phase of telephone development in maharashtra
First published on: 06-03-2014 at 12:23 IST