मुंबई : निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात सलग दुसऱ्या सत्रात घसरण कायम असल्याने प्रमुख निर्देशांकात मंगळवारी १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. अत्यंत अस्थिर व्यवहारात मंदीवाल्यांनी बाजारावर जम बसविल्याने सत्राच्या अखेर अध्र्या तासात बाजारातील घसरण वाढली. मंगळवारचे व्यवहार थंडावले तेव्हा सेन्सेक्स ७०३.५९ अंशांच्या घसरणीसह ५६,४६३.१५ वर स्थिरावला. तर  निफ्टीमध्ये २१५ अंशांची घसरण झाली. तो १६,९५८.६५ पातळीवर बंद झाला.