सत्राच्या सुरुवातीला तेजी नोंदविणाऱ्या भांडवली बाजारात बुधवारी सत्रअखेर मात्र विक्री दबाव राहिला. परिणामी व्यवहारात १,३४६ अंश तेजी नोंदविणारा मुंबई निर्देशांक दिवसअखेर मात्र ३१०.२१ अंशांनी घसरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अखेर ३०,३७९.८१ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६८.५५ अंश घसरणीसह ८,९२५.३० पर्यंत थांबला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये बुधवारच्या तुलनेत एक टक्क्य़ापर्यंत घसरण नोंदली गेली.

करोनाचे संकट कायम असतानाच सरकारने येणाऱ्या टाळेबंदी समाप्ती कालावधीनंतर जाहीर केलेल्या शिथीलचे मात्र गुंतवणूकदारांनी स्वागत केले नाही. त्यातच डॉलरच्या तुलनेत वाढत्या रुपयाचाही विपरित परिणाम भांडवली बाजारावर दिसून आला.

विस्तारीत टाळेबंदीतून काही क्षेत्रांना मोकळीक मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले. त्याचबरोबर करोनाबाधित आणि बळींची संख्या देशभरात वाढतच आहे.

सेन्सेक्मधील प्रमुख ३० पैकी कोटक महिंद्र बँक, हीरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स, एचडीएफसी लिमिटेड, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी यांचे मूल्य रोडावले. तर हिंदुस्थान यूनिलिव्हर, एचसीएल टेक, आयटीसी, नेस्ले इंडिया यांना मात्र ६ टक्केपर्यंतच्या घसरणीला सामोरे जावे लागले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक, वित्त, ऊर्जा, वाहन, ग्राहकपोगी वस्तू आदी २.५० टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर स्थावर मालमत्ता, पोलाद निर्देशांक ४.३३ टक्क्य़ांपर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप १.३२ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

रुपयाचा नवा तळ

डॉलरच्या तुलनेत रुपयाने नव्याने मूल्यतळ गाठला. बुधवारी स्थानिक चलनात थेट १७ पैशांची आपटी अनुभवली गेल्याने रुपया डॉलरसमोर ७६.४४ पर्यंत कमकुवत बनला. परकीय चलन विनिमय मंचावरील त्याचा हा ऐतिहासिक नीचांक ठरला. चलनाची बुधवारच्या व्यवहाराची सुरुवात ७६.०७ या वरच्या टप्प्यावर सुरू झाल्यानंतर सत्रात तो ७५.९९ पर्यंत उंचावला. मात्र व्यवहारात ७६.४८ पर्यंत नीचांक गाठल्यानंतर त्यात बुधवारच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणात घसरण झाली. वाढत्या टाळेबंदी कालावधीबाबतची चिंता या व्यवहारावर उमटली.

Web Title: Sensex slips to end nifty deal abn
First published on: 16-04-2020 at 00:12 IST