पुणे : सहकार क्षेत्रातील कॉसमॉस को-ऑप. बँकेमध्ये आर्थिकदृष्टय़ा सशक्त असलेल्या श्री शारदा सहकारी बँकेचे विलीनीकरण करून घेण्यात आले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने मार्च २०२१ मध्ये सहकारी बँकांच्या विलीनीकरणाबाबत प्रसृत केलेल्या परिपत्रकानुसार हे सहकार क्षेत्रात झालेले देशातील पहिलेच विलीनीकरण आहे.

कॉसमॉस बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर, उपाध्यक्ष सचिन आपटे आणि व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शारदा सहकारी बँकेच्या आठ शाखा असून व्यावसायिक उलाढाल ५५० कोटी रुपयांची आहे. दोन सक्षम बँकांनी एकत्र येणे हे या विलीनीकरणाचे वैशिष्टय़ आहे असे नमूद करून सचिन आपटे म्हणाले की, रिझव्‍‌र्ह बँकेचे परिपत्रक आल्यानंतर दोन्ही बँकांनी सकारात्मक विचार करून, ऑक्टोबर २०२१ मध्ये हा विलीनीकरण प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेकडे दाखल केला होता. पत्रकार परिषदेत अ‍ॅड. प्रल्हाद कोकरे, प्रा. नंदकुमार काकिर्डे, अनुराधा गडाळे, प्रा. राजेश्वरी धोत्रे यांचीही उपस्थिती होती.

Thane, ST, bogus certificate,
ठाणे : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एसटी महामंडळात नोकरी
Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
megha engineering 60 percent donation to bjp
Electoral Bonds Data : ‘मेघा इंजीनियरिंग’ची ६० टक्के देणगी भाजपला; रोखे खरेदी केल्यानंतर सरकारी कंत्राटे

या विलीनीकरणानंतर सात राज्यांत विस्तार असलेल्या कॉसमॉस बँकेच्या एकूण १५२ शाखा झाल्या आहेत. २८ हजार कोटी रुपयांची उलाढाल असणारी कॉसमॉस ही पुणे शहरात आता सर्वात जास्त शाखा असणारी बँक झाली असून आतापर्यंत बँकेने एकूण १६ बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे, अशी माहिती अपेक्षिता ठिपसे यांनी दिली. 

दरम्यान, या विलीनीकरणामुळे शारदा बँकेच्या सर्व आठ शाखांमधून कॉसमॉस बँकेच्या नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग अशा अत्याधुनिक सेवांचा लाभ त्या बँकेच्या सर्व खातेदारांना मिळणार आहे. या आधुनिक सुविधा खातेदारांना मिळाव्यात या हेतूने श्री शारदा सहकारी बँकेने विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारल्याचे त्या म्हणाल्या.