श्रीराम ऑटोमाल इंडिया लिमिटेडने (सामिल) कॉर्पोरेशन बँकेसोबत करार करून या वर्षांतील आणखी एक करार केला आहे. प्री-ओन्ड वाहने व उपकरणे यातील आघाडीची सेवा पुरवठादार कंपनी म्हणून, कंपनी बँकेकडील प्री-ओन्ड वाहनांचा साठा कमी करण्यासाठी आपल्याकडील समावेशक बििडग सुविधा देऊ करणार आहे.
बँकेकडील सर्व प्रकारच्या प्री-ओन्ड व्यावसायिक गाड्या, ट्रॅक्टर, बस, कार व एसयूव्ही, तीनचाकी व दुचाकी यांची विक्री होण्यासाठी कंपनी परिपूर्ण उपाय देणार आहे.
या करारानुसार, सामिल आपल्या नियमित भौतिक व ऑनलाइन बििडग कार्यक्रमामार्फत बँकेला वाहनांची विक्री करण्यास मदत करणार आहे. ‘कॉर्पोरेशन बँकेसोबतच्या सहयोगामार्फत, आमच्या ऑनलाइन व भौतिक अशा दोन्ही नियमित कार्यक्रमांमार्फत अधिकाधिक विक्री करण्यासाठी साठवणुकीत वाढ करून आमचा प्री-ओन्ड वाहन व्यवसाय अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे’, असे समीर मल्होत्रा (सामिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणाले.
‘कॅमल आर्ट कॉन्टेस्ट’चे विजेते सन्मानित
मुंबई : देशाची अग्रेसर व प्रमुख स्टेशनरी कंपनी, कोकुयो कॅमलिन लिमिटेड (पूर्वी कॅमलिन लिमिटेड)ने जगातील सर्वात मोठी कला स्पर्धा ‘कॅमल आर्ट कॉन्टेस्ट २०१४’ (पूर्वी ‘ऑल इंडिया कॅमल कलर कॉन्टेस्ट – एआयसीसीसी’ म्हणून प्रसिद्ध) च्या निकालाची घोषणा केली. प्रतिष्ठित चित्रपट अभिनेता व रंगभूमी व्यक्तिमत्त्व ओम पुरी यांनी  मुंबई येथे आयोजित केलेल्या समारंभामध्ये मुलांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले.  
ब्रिजस्टोनच्या मुंबईतील दालनाचे उद्घाटन
मुंबई : जगातील क्रमांक एकची टायर आणि रबर उत्पादक कंपनी ब्रिजस्टोनने खारघर, नवी मुंबई येथे नवीन विशेष निवडक दालनाची नुकतीच सुरुवात केली. या विशेष दालनाचे  उद्घाटन ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक वैभव सराफ यांनी केले. या दालनाचे उद्दिष्ट विक्रीवर भर देण्यावर राहणार आहे, असा दावा यावेळी करण्यात आला.