पाच लाखांपर्यंत हस्तांतरणाची सुविधा

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेने मंगळवारी ‘इमिजिएट पेमेंट सव्र्हिस’ अर्थात ‘आयएमपीएस’ ही ऑनलाइन आंतरबँक निधी हस्तांतरणाच्या सुविधेची मंगळवारी विस्ताराची घोषणा केली. बँकेच्या शाखेतून, नेट बँकिंग किंवा एसबीआय योनो अ‍ॅप माध्यमातून ‘आयएमपीएस’द्वारे २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरणाची सुविधा आता पाच लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

स्टेट बँकेच्या शाखेतून ग्राहकांनी १,००० ते १०,००० रुपयांपर्यंतचा निधी हस्तांतरित केल्यास २ रुपये सेवा शुल्क अधिक वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जातो. १०,००० ते १,००,०००  रुपयांपर्यंतच्या निधीवर ४ रुपये सेवा शुल्क अधिक जीएसटी आणि १ लाख ते २ लाख  रुपयांपर्यंतच्या निधी हस्तांतरणावर १२ रुपये सेवा शुल्क अधिक अधिक जीएसटी आकाराला जातो. तर आता नव्याने उपलब्ध केलेल्या २ लाख ते ५ लाख रुपयांच्या निधी हस्तांतरणाच्या टप्प्यात २० रुपये सेवा शुल्क अधिक जीएसटी आकाराला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या उपक्रमाअंतर्गत ग्राहकांनी नेटबँकिंग, एसबीआय योनोच्या माध्यमातून ‘आयएमपीएस’ व्यवहार केल्यास त्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे बँकेने सांगितले आहे.  ‘आयएमपीएस’च्या माध्यमातून अतिशय कमी वेळात निधी हस्तांतरण केले जाते. ही सेवा मोबाइल फोन, एटीएम, इंटरनेट बँकिंग आदींच्या मदतीने उपयोगात आणली जाते. ही सुविधा ह्यनॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाह्णच्या (एनपीसीआय) माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. तिचे वैशिष्ट्य म्हणजे हस्तांतरण केलेला निधी विनाविलंब आणि अतिशय कमी वेळात संबंधिताच्या बँक खात्यात इच्छित रक्कम जमा केली जाते. दिवसाच्या २४ तासांमध्ये कधीही रक्कम संबंधिताच्या खात्यात हस्तांतरण केली असता, ती तत्क्षणी जमा होते.