पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या टाटा मोटर्सने बुधवार, १९ जानेवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमती सरासरी ०.९ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहननिर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून मंगळवारी सांगण्यात आले. तर ठरावीक वाहनांवर १० हजार रुपयांपर्यंत कपातदेखील कंपनी करणार आहे. वाहननिर्मितीसाठी आवश्यक सुटय़ा घटकांच्या किमतीत वाढ झाली आहे. शिवाय निर्मितीच्या विविध टप्प्यांवर वाढलेला सामग्री खर्च पाहता किमती वाढविणे भाग ठरले. मात्र ग्राहकांवर कमीत कमी भार पडावा असे प्रयत्न केले गेले आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले. याच वेळी ग्राहकांकडून आलेल्या अभिप्रायाला ध्यानात घेत कंपनीने ठरावीक वाहनांतील काही अनावश्यक वैशिष्टय़े कमी करून,  १०,००० रुपयांपर्यंतची कपातदेखील केली आहे. टाटा मोटर्स देशांतर्गत बाजारपेठेत टियागो, पंच आणि हॅरियरसह अशा प्रवासी वाहनांची विक्री करते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors vehicle price hike decision ysh
First published on: 19-01-2022 at 02:05 IST